
छत्तीसगडमधील दुर्गमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रामनवमीच्या दिवशी कन्याभोजनासाठी तिच्या लहान मैत्रिणींसोबत बाहेर गेलेली सहा वर्षांची मुलगी मृतावस्थेत आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिचा मृतदेह गाडीत आढळून आला आहे. या मुलीचे दोन्ही हात गाडीत बांधलेले आढळले. यामुळे खळबळ उडाली आहे.