धक्कादायक! IndiGo एअर होस्टेससोबत प्रवाशांचे गैरवर्तन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

arrested

धक्कादायक! IndiGo एअर होस्टेससोबत प्रवाशांचे गैरवर्तन

लखनऊ : इंडिगोच्या एअर होस्टेससोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना हैदराबाद ते लखनऊ प्रवासादरम्यान घडली. प्रदिप, कुलदीप आणि ज्ञानेंद्र अशी गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांची नावे आहेत. (Three passengers arrested for misbehaving with the air hostess of a Lucknow-bound Indigo flight)

हेही वाचा: ‘सीआरपीएफमुळे दहशतवादी कारवायांत घट’

गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर केबिन क्रूने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.

इंडिगोचे विमान हैदराबादहून लखनऊला जात होते.या प्रवासादरम्यान दोन प्रवाशांनी एअर होस्टेससोबत गैरवर्तन केले.

हेही वाचा: आता UGC Indiaचं ट्विटर अकाउंट हॅक; योगी आदित्यनाथांनाही हॅकींगचा फटका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केबिन क्रूने त्यांच्या तक्रारीत आरोप केला आहे की, आरोपींनी संपूर्ण फ्लाइटमध्ये एअर होस्टेससोबत दारू पिऊन गैरवर्तन केले. लखनऊमध्ये विमान खाली येताच पीडित एअर होस्टेसनी CISF कर्मचाऱ्यांना याबाबत सांगितले. त्यानंतर आरोपींना सरोजिनी नगर पोलिस ठाण्यात नेण्यात आले आणि त्यांच्यावर आयपीसी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी त्यांना अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Three Passengers Arrested For Misbehaving With The Air Hostess Of A Lucknow Bound Indigo Flight

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top