म्होरक्यासह तीन दहशतवाद्यांचा खात्मा; शोपियात अजुनही चकमक सुरु 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 7 October 2020

काही दहशतवादी लपून बसले आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाल्यावर सुरक्षा रक्षकांकडून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं.

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी आणि भारताच्या सुरक्षा दलामध्ये चकमक घडून येत असल्याची माहिती आहे. बुधवारी पहाटेपासून ही चकमक सुरु झाली आहे. शोपियांमधील सुजान सेक्टरमध्ये ही घटना घडली आहे. या सेक्टरमध्ये काही दहशतवादी लपून बसले आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाल्यावर सुरक्षा रक्षकांकडून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं. त्याचवेळी अचानक दहशतवाद्यांनी गोळाबार करायला सुरवात केली. या गोळीबाराला प्रत्त्यूत्तर देत सुरक्षा रक्षकांनीही गोळीबार केला. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सुरक्षा रक्षकांना यश आलेलं आहे. या तीघांमध्ये एका दहशतवादी कमांडरचाही समावेश आहे.

हेही वाचा - Hathras : मुलीनेच मुलाला बोलावलं असेल; मात्र मुलेच का दोषी? भाजप नेत्याचे धक्कादायक विधान
अद्याप सुरक्षारक्षकांकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. आणखी काही दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता आहे. त्यांना शोधण्याची मोहीम सुरु आहे. बुधवारी सकाळपासूनच सुरु झालेल्या या चकमकीत आधी दोन दहशतवादी मारले गेले होते. नंतर आणखी एका दहशतवाद्याला मारण्यात आलं आहे. यात त्यांचा एक म्होरक्याही ठार झाला असल्याची माहिती मिळाली आहे. 

हेही वाचा - जगातील ५८ टक्के महिला ऑनलाइन छळाच्या बळी

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शोपिया या जिल्ह्यातील झानपोरा भागातील सुजान या गावात हे दहशतवादी लपून बसले होते. त्यांचा शोध घेत पोलिसांनी मोहिम सुरु केली. लपून बसलेल्या घरातून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. याला पोलिसांनीही प्रत्युत्तर देत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जम्मू आणि काश्मिरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया या सुरुच आहेत. सोमवारीच दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 2 जवान शहिद तर तीन जवान जखमी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three terrorists encountered with security forces in Shopian