esakal | जगातील ५८ टक्के महिला ऑनलाइन छळाच्या बळी
sakal

बोलून बातमी शोधा

Women Online harassment

बदलत्या काळानुसार मुली आणि महिला या ऑनलाइन छळ आणि अत्याचाराला सर्वाधिक बळी पडत असल्याचे एक सर्वेक्षणातून समोर आले आहे. इंग्लंड येथील ‘प्लान इंटरनॅशनल’ या मानवतावादी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून जगभरातील ५८ टक्के महिलांना ऑनलाइन अत्याचाराला सामोरे जावे लागत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

जगातील ५८ टक्के महिला ऑनलाइन छळाच्या बळी

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - बदलत्या काळानुसार मुली आणि महिला या ऑनलाइन छळ आणि अत्याचाराला सर्वाधिक बळी पडत असल्याचे एक सर्वेक्षणातून समोर आले आहे. इंग्लंड येथील ‘प्लान इंटरनॅशनल’ या मानवतावादी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून जगभरातील ५८ टक्के महिलांना ऑनलाइन अत्याचाराला सामोरे जावे लागत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येत्या ११ ऑक्‍टोबरला साजरा केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘प्लान इंटरनॅशनल’ या संस्थेने भारतासह ब्राझील, नायजेरिया, स्पेन, ऑस्ट्रेलिया, जपान, थायलंड, अमेरिकेसह २२ देशांतील १५ ते २५ वर्षे वयोगटातील १४ हजार मुली आणि महिलांशी संवाद साधला. एक एप्रिल ते ५ मेदरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार या वयोगटातील जवळपास ५८ टक्के मुली आणि महिलांनी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्‌सॲप यांसारख्या समाजमाध्यमातून ऑनलाइन छळ किंवा अत्याचाराला बळी पडल्याचे मान्य केले. सर्वेक्षण करण्यात आलेल्या २२ देशांपैकी मुलीवरील अत्याचाराच्या सर्वाधिक म्हणजे ६३ टक्के घटना युरोपात घडल्या.

hathras case: ''दलित मुलीचा बलात्कारानंतर खून होतो, पण मोदींचा एकही शब्द नाही''

या घटनांमध्ये युरोपपाठोपाठ लॅटिन अमेरिका (६० टक्के), आशिया-पॅसिफिक विभाग (५८) आणि आफ्रिका (५२ टक्के) यांचा क्रमांक लागत असल्याची समोर आले. ४७ टक्के महिलांना शारीरिक किंवा लैंगिक अत्याचाराच्या धमक्‍या देणे तसेच ५९ टक्के आक्षेपार्ह आणि मानहानीजनक भाषेतील टीकाटिप्पणीला सामोरे जावे लागल्याचेही या अहवालातून समोर आले. एलजीबीटीक्‍यू प्रवर्गातील अनेक महिलांनी तर या प्रकारच्या अत्याचारांना वारंवार सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. समाजमाध्यमांवर अशा प्रकारच्या अत्याचाराला बळी पडणाऱ्या महिलांना संबंधित आरोपींबाबत त्यांना फारशी माहितीही नसते.

Bihar Election:मुख्यमंत्री 'जेडीयू'चाच; भाजपने नितीशकुमारांना मानले मोठा भाऊ

परिचितांकडूनही अत्याचार
अनेक महिलांना आपल्या परिचितांकडून झालेल्या ऑनलाइन अत्याचाराला किंवा त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामध्ये सध्याचा किंवा पूर्वीच्या जोडीदारांकडून ११ टक्के महिलांवर, तर शाळेत किंवा कामाच्या ठिकाणी २१ टक्के महिलांवर अत्याचार झाल्याचे या सर्वेक्षणातून उघडकीस आले.

खवय्यांसाठी खुशखबर! आता स्ट्रिट फूडही मिळणार ऑनलाईन  

मानसिकतेवर परिणाम
ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या अत्याचारामुळे अनेक महिलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. त्यापैकी ४२ टक्के महिलांनी मानसिक  किंवा भावनिक तणावाला, तर तेवढ्याच महिलांनी या प्रकारच्या घटनांमुळे आत्मसन्मान कमी झाल्याचे सांगितले.

अनेक मुली ऑनलाइन अत्याचाराबाबत फारशा बोलत नाहीत. लैंगिक समानता आणि एलजीबीटीक्‍यूच्या मुद्द्यांवर काम करणाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही या प्रकारच्या प्रसंगाला सामोरे जावे लागत असल्याचेही समोर आले आहे. आजच्या डिजिटल युगात मुलींना ऑनलाइन विश्‍वापासून बाहेर ठेवणे म्हणजे त्यांच्या प्रगतीत आडकाठी आणण्यासारखे आहे.
- ॲनी बर्गिट अल्ब्रेक्‍टसन, सीईओ, प्लान इंटरनॅशन

Edited By - Prashant Patil