थरार! धावत्या रेल्वेपासून बचावासाठी रुळांवर झोपली महिला; पाहा व्हिडिओ 

टीम ई-सकाळ
Thursday, 18 February 2021

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर महिलेच्या धाडसाचे कौतुक करणाऱ्या आणि तिला सल्ला देणाऱ्या अशा अऩेक कमेंट्सही आल्या आहेत.

हरयाणाच्या रोहतकमध्ये एक थरारक घटना घडली असून चालत्या रेल्वे खाली आल्याने दोन रुळांच्यामध्ये झोपून एका महिलेनं स्वतःचा जीव वाचवला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर महिलेच्या धाडसाचे कौतुक करणाऱ्या आणि तिला सल्ला देणाऱ्या अशा अऩेक कमेंट्सही आल्या आहेत.

 

माध्यमांतील वृत्तांनुसार, एक महिला धावत्या रेल्वेखाली अडकली त्यानंतर तिनं उठून बाजूला जाण्याचा प्रयत्न न करता दोन रुळांच्यामध्ये झोपून राहून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी हे थरारक दृश्य पाहून आश्चर्य व्यक्त केलं.

'श्वेता'च्या मिम्सचा सोशल मीडियावर धुमाकूळ; जाणून घ्या यामागचं कारण
सुरुवातीला रेल्वे गाडी थांबली होती यावेळी संबंधित महिला रुळ पार करण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हाच हिरवा सिग्नल लागल्याने रेल्वे अचानक सुरु झाली. यावेळी आपण पुढे जावं की मागं यामध्ये महिला गोंधळून गेली त्यानंतर तिनं रल्वे रुळांवरच खाली झापून राहण्याचा पर्याय निवडला आणि रेल्वे पुढे जाण्याची वाट पाहू लागली. रेल्वे तिच्या अंगावरुन रुळांवरुन पुढे गेल्यानंतर ही महिला सुखरुप बाहेर पडली. हे दृश्य पाहणाऱ्या लोकांनी संबंधित महिलेच्या तत्काळ निर्णय क्षमतेचं आणि धाडसाचं कौतुक केलं. 

भारत india


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thriling video Women sleeping on rails to rescue herself from moving train

Tags
टॉपिकस
Topic Tags: