Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या दुर्घटनेपूर्वी पायलट्सनं शेवटचा संदेश दिला होता. हा संदेश नेमका काय होता? हे आता समोर आलं आहे. विमान दुर्घटनेमागील मोठं कारण यामुळं समोर आलं आहे. .Plane Crash: अहमदाबाद विमान अपघाताची संपूर्ण घटना पहिल्यांदा कॅमेऱ्यात कैद करणारा आर्यन कोण? सत्य जाणून आश्चर्य वाटेल .काय होता शेवटचा संदेश?'Thrust not achieved falling Mayday' असा संदेश दुर्घटनाग्रस्त एअर इंडियाच्या दोन्ही पायलट्सनं कोसळल्यापूर्वी दिला होता. याचा अर्थ असा होतो की, 'अपेक्षित वेग गाठू शकलेलो नाही, त्यामुळं आम्ही कोसळतोय मे डे!' याचाच अर्थ मदतीसाठी पायलट्सनं ATCकडं मदत मागितली होती. पण मदत पुरवण्या इतका वेळ आणि विमानाकडं तशी परिस्थिती नसल्यानं अखेर ते भर वस्तीत कोसळलं. या भीषण दुर्घटनेत विमानातील २३० पैकी २२९ प्रवाशांसह १२ क्रू मेंबर्सचा जागीच मृत्यू झाला. तर एक प्रवाशी आश्चर्यकारकरित्या बचावला. .शेवटच्या संदेशावरुन काय कळतं?पायलट्सन् दिलेल्या या शेवटच्या संदेशावरुन हेच कळतं की, विमानामध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली होती. या तांत्रिक समस्येमुळं विमान जरी हवेत झेपावलं असलं तरी त्याला अपेक्षित वेग आणि अँगल उपलब्ध होऊ शकला नाही. या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी विमानाच्या दोन्ही इंजिनंमध्ये तेवढी पावरच जनरेट होऊ शकली नाही. त्यामुळं केवळ काही सेकंदातच विमान क्रॅश झालं तसंच उड्डाणावेळी विमानात सव्वा लाख लिटर इंधन असल्यानं एवढ्या मोठ्या इंधनानं विमान क्रॅश होताच पेट घेतला आणि मोठा स्फोट झाला. त्यामुळं या विमानातून प्रवास करणारे जवळपास सर्वच प्रवासी तसंच ज्या हॉस्टेलच्या इमारतीवर हे विमान कोसळलं त्या इमारतीतील विद्यार्थी असे सर्वजण मिळून जवळपास २७० जणांचा मृत्यू झाला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.