

Tirupati Laddu Ghee Adulteration
esakal
Tirupati Laddu controversy : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादासाठी वापरण्यात येणारे तूप तयार करताना रिफाइंड पाम ऑइल, पामोलिन, पाम कर्नेल ऑइलसह विविध रसायनांचा कथित वापर करण्यात आल्याचे अंमलबजावणी संचालनालयाने (ED) म्हटले आहे. या प्रकरणात तूप उत्पादक कंपनी ‘सुकृती फूड्स’चे प्रवर्तक कैलासचंद मंगला यांना ईडीने अटक केली आहे.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, कैलासचंद मंगला यांना १७ सप्टेंबर रोजी हैदराबाद येथील ईडीच्या कार्यालयाने तिरुमला तिरुपती देवस्थानम् (TTD) तूप भेसळ प्रकरणात अटक केली. त्यांना विशाखापट्टणम येथील विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.