

TMC MP Resigns, Fresh Trouble for Mamata Banerjee
Esakal
इंडिया आघाडीच्या बैठकीआधी तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या खासदारांनी ममता बॅनर्जींची साथ सोडण्यास सुरुवात केलीय. सोमवारी राज्यसभेचे खासदार सुखेंदू शेखर रे यांनी खासदारकीसह पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. आमदारानंतर खासदारांनीही ममता बॅनर्जींविरोधात भूमिका घेतली आहे. आधीपासूनच खासदारांमध्ये असंतोष होता असं सुखेंदू यांनी म्हटलं होतं. पश्चिम बंगालमध्ये पक्षाला खिंडार पडत असताना आता खासदाराच्या राजीनाम्याने मोठा धक्का बसला आहे. TMC Faces New Setback After MP's Resignation