Crime News: आधी जामीन मिळवून दिला अन् नंतर केली हत्या; शेतकऱ्याने मुलाच्या हत्येचा घेतला बदला

एका शेतकऱ्याने आपल्या मुलाचा बदला घेण्यासाठी आरोपींना जामीन मिळवून दिला अन्...
Crime News
Crime Newsesakal

उत्तर प्रदेशमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका शेतकऱ्याने आपल्या मुलाचा बदला घेण्यासाठी आरोपींना जामीन मिळवून दिला आणि त्यानंतर त्यांची हत्या केली. (Crime News)

खेरीतील मितौली भागात राहणारे 50 वर्षीय शत्रुधन लाला यांची गेल्या शुक्रवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. लालाच्या डोक्यात तीन गोळ्या झाडण्यात आल्या.

तपासाअंती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शत्रुधनची हत्या त्याच्या मुलाचे सासरे काशी कश्यप यांनी केली होती. काशीच्या पत्नीने शत्रुधन लालाच्या मदतीने आपल्याच 14 वर्षीय मुलगा जितेंद्रची हत्या केली.(Crime News)

मुलाने दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्याचा आरोप आहे. काशी कश्यप दुसऱ्या एका खटल्यात तुरुंगात असताना पत्नीने मुलाची हत्या केली होती.

Crime News
LIVE Marathi News Updates: सांताक्रूझमध्ये ८५ वर्षीय वृद्धाची हत्या

१४ वर्षांच्या मुलाच्या हत्येप्रकरणी काशीची पत्नी आणि शत्रुधन लाला यांना पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले होते. दोघेही तुरुंगवास भोगत असतानाही काशी कश्यप आपल्या मुलाच्या मारेकऱ्यांकडून बदला घेण्याच्या तयारीत होता. त्या पार्श्वाभूमीवर तो कट रचत होता.

2022 मध्ये तुरुंगातून बाहेर आल्यानंतर काशीने सर्वप्रथम वकिलाशी संपर्क साधला. त्यांच्यामार्फत शत्रुधन लालाला जामीन मिळवून दिला. लाला तुरुंगातून बाहेर आल्यावर काशी त्याला मारण्याची संधी शोधू लागली. योग्य संधी मिळताच त्याने लालाची हत्या केली.(Crime News)

काशीच्या पत्नीने न्यायालयात दाद मागितली अन् ती अडकली

काशी कश्यप 2020 मध्ये एका हत्येप्रकरणी तुरुंगात होती. 2021 मध्ये त्यांचा 14 वर्षांचा मुलगा जितेंद्र अचानक घरातून गायब झाला. काही दिवसांनी त्याचा मृतदेह नदीच्या काठावर पडलेला आढळून आला. जितेंद्रचा बुडून मृत्यू झाला असावा, असे पोलिसांना वाटले. त्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही.

Crime News
MiG-21 Crashed : राजस्थानमध्ये घरावर कोसळलं मिग-२१! दोघांचा मृत्यू; समोर आला Video

दरम्यान, काशी कश्यपची पत्नी आणि शत्रुघ्न लाला यांच्यात काही वाद झाला. जितेंद्रच्या मृत्यूबाबत एफआयआर नोंदवण्याची विनंती दोघांनी कोर्टात केली. आता पोलिसांनी पुन्हा तपास सुरू केला असता जितेंद्रच्या आईने शत्रुधनसह त्याची हत्या केल्याचे समोर आले.(Crime News)

दोघांचीही तुरुंगात रवानगी करण्यात आली. दुसरीकडे तुरुंगात असलेल्या काशी कश्यपला आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच तो संतापला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com