Double Decker Bus Journey: आजच धावली होती देशातील ही डबल डेक्कर बस; तब्बल 85 वर्षांचा प्रवास

डबल डेक्करने प्रवास करावा असं स्वप्न तरुणांनी मनात धरलं असेलच. पण या बसच्या प्रवासाबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
India’s First Double Decker Bus
India’s First Double Decker Busesakal

Double Decker: किती लोकांनी डबल डेक्कर मध्ये प्रवास केला आहे याच उत्तर देणं जरी कठीण असलं तर डबल डेक्कर प्रत्येकाला माहिती आहे, अर्थात कारण बॉलीवुडचे अनेक सिनेमे आणि डबल डेक्कर मध्ये चित्रित झालेली गाणी. ही गाणी बघून एकदा तरी डबल डेक्करने प्रवास करावा असं स्वप्न तरुणांनी मनात धरलं असेलच. पण या बसच्या प्रवासाबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

मुंबई अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, तिला मायानगरी का म्हणतात हे वेगळ्याने सांगायला नको. पूर्वीच्या काळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बैलगाडी, टांगा किंवा टॅक्सीचा वापर करायचे. पण सिटी बसचा प्रवास बेस्टच्या मार्फत 1926 मध्ये सुरू झाला.

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन अर्थात बेस्ट (BEST) या कंपनीनं सुरू केलेली ही बससेवा मुंबईतलीच नाही तर पूर्ण देशातली पहिली बस सेवा होती. अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केटपर्यंत पहिली बस धावली होती. नंतर सरकार आणि बीएमसीच्या आवाहनानुसार कंपनीने 1934 मध्ये मुंबईच्या उत्तर भागात आपल्या सेवेचा विस्तार केला. 1937 मध्ये डबल डेकर बस वापरात आणली गेली. मुंबई आणि देशातील पहिली मर्यादित बस सेवा 1940 मध्ये कुलाबा ते माहिम अशी चालवली गेली.

टॅक्सी चालकांनी केलेला संप:

बेस्ट सेवा सुरू झाल्या नंतर मुंबईकरांनी टॅक्सी सोडून बसने प्रवास करणं निवडल, कारण ते खिशाला परवडणार होतं. यामुळे टॅक्सी चालकांनी याला विरोध करत संप केला होता, तरीही वर्षभरात 6 लाख लोकांनी या बससेवेचा लाभ घेतला.

1865 मध्ये सुरू झाला होता अशा बस सेवेचा विचार

मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या बेस्टची सुरुवात रातोरात झालेली नाही. 1865 मध्ये, मुंबईत वाहतूक व्यवस्था तयार करण्यासाठी एका अमेरिकन कंपनीनं घोड्याच्या सहाय्यानं ओढल्या जाणाऱ्या ट्राम सेवेच्या परवान्यासाठी अर्ज केला होता. 1873 नंतर बॉम्बे ट्रॅमवे कंपनी लिमिटेडनं मुंबईत घोड्याच्या सहाय्यानं ओढल्या जाणाऱ्या ट्राम चालवल्या गेल्या. या कंपनीने नोव्हेंबर 1905 मध्ये वाडी बंदर इथं एक औष्णिक उर्जा केंद्र स्थापित केले. 1947 मध्ये, बेस्ट महानगरपालिकेच्या अखत्यारीतील कंपनी बनली आणि तिचं नाव बदलून बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाई आणि ट्रान्सपोर्ट अर्थात बेस्ट करण्यात आलं.

India’s First Double Decker Bus
Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

1995 पर्यंत बॉम्बे बृहन्मुंबई वीजपुरवठा आणि परिवहन ही कंपनी बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट म्हणून ओळखली जात होती पण जेव्हा 1995 मध्ये बॉम्बेचे नाव मुंबई करण्यात आलं तेव्हा या कंपनीचं नावही बदलून बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक असं ठेवलं गेलं तरीही ती बेस्ट म्हणून ओळखली जाते. आज बेस्ट ही मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत स्वतंत्र संस्था आहे.

आज मुंबई मेटरी ट्रेन साठी कितीही प्रसिद्ध असली तरीही बेस्ट सेवा व्यवस्थित कार्यरत आहे एवढेच नाही तर आता डबल डेक्कर बस एसी सेवाही देतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com