Vikram Vij success story : टॉम क्रूझला देखील रांगेत उभे करणारे शेफ विक्रम विज आहेत तरी कोण?

पंजाबच्या अमृतसरमध्ये जन्मलेल्या विक्रम विजला इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला
Vikram Vij success story
Vikram Vij success storyesakal

Vikram Vij success story : भारतात जन्मलेल्या विक्रम विजबद्दल बोलायचं तर, त्यांची गणना जगातील सर्वात श्रीमंत शेफमध्ये केली जाते. ते अनेक व्यवसाय आणि रेस्टॉरंट्सचे मालक आहेत. जगभर त्यांचं नाव आहे. शेफ असण्यासोबतच ते लेखकही आहे. पंजाबच्या अमृतसरमध्ये जन्मलेल्या विक्रम विजला इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.

वीज घरातून बाहेर पडले तेव्हा त्यांच्याकडे तिकीट आणि एक सुटकेस होती, ज्यात त्यांच्या आईने बनवलेले मसाले होते.

वीजला यांना यश कसं मिळालं?

विक्रम वीज यांची सुरुवात ऑस्ट्रियातील हॉटेल मॅनेजमेंटच्या रुपात सुरू होते. सुरुवातीला त्यांच्याकडे खायलाही पैसे नव्हते. यानंतर वीज यांना आल्प्समध्ये असलेल्या एका आलिशान हॉटेलमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या आयुष्यातील हा एक मोठा टर्निंग पॉइंट होता. इथे त्यांना मोठ यश मिळालं.

वीजच्या डिशने प्रभावित होऊन एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने त्यांना कॅनडातील बॅन्फ स्प्रिंग्स हॉटेलमध्ये नोकरीची ऑफर दिली. इथेही त्यांनी लोकांना आपल्या जेवणाचे वेड लावले.

Vikram Vij success story
Chef Sanjeev Kapoor : मास्टर शेफला खावं लागलं शिळ अन्न; एअर इंडीयावर भडकले संजीव कपूर

1994 मध्ये स्वतःची सुरुवात

विक्रम वीज यांनी 1994 मध्ये पहिला उपक्रम सुरू केला. एक लहान रेस्टॉरंट उघडण्यापूर्वी त्यांनी व्हँकुव्हरमधील अनेक रेस्टॉरंटमध्ये काम केलं. 1994 मध्ये त्यांनी त्यांची भावी बिझनेस पार्टनर मीरू धलवालासोबत लग्न केलं.

या दोघांच्या जोडीने मिळून अनेक व्यवसाय उभे केले. यामध्ये वीज ऑन कॅम्बी, वीज अँट होम करी फॅक्टरी आहेत. 2012 मध्ये दोघेही वेगळे झाले. पण विक्रम वीज यांनी आयुष्याच्या या टप्प्यातही यशाची कहाणी सुरूच ठेवली.

Vikram Vij success story
Master Chef India 7: नयनज्योती सैकिया ठरला मास्टरशेफ इंडीया 7 चा विजेता, मिळाले ईतके पैसे

टॉम क्रूझसह अनेक स्टार्स रांगेत उभे होते

कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या टॉप शेफ्सनी बनवलेल्या खाद्यपदार्थांना खूप मागणी आहे. व्हँकुव्हर सनच्या वृत्तानुसार, हॉलिवूड स्टार टॉम क्रूझ, फेसबुक बॉस मार्क झुकरबर्ग आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो हे देखील त्याच्या चाहत्यांमध्ये आहेत.

त्यांनी बनवलेल्या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी या लोकांना रांगेत उभ रहावं लागतं. वीज हे देखील गुंतवणूकदार आहेत. त्यांनी कॅनेडियन रिअॅलिटी टीव्ही शो ड्रॅगन्स डेनमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांनी दोन पुरस्कार विजेत्या कुकबुक्सचे सह-लेखन देखील केले आहे.

अनेक अहवालांनुसार, 2023 मध्ये 58 वर्षीय विक्रम वीज यांची अंदाजे एकूण संपत्ती $50 दशलक्षांपेक्षा जास्त आहे. भारतीय चलनात बोलायचं झालं तर ते 410 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com