Chef Sanjeev Kapoor : मास्टर शेफला खावं लागलं शिळ अन्न; एअर इंडीयावर भडकले संजीव कपूर

एअर इंडीयाने दिलेल्या ब्रेकफास्टवर संजीव कपूर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली
Chef Sanjeev Kapoor
Chef Sanjeev Kapoor

प्रसिद्ध शेफ संजीव कपूर नेहमी विविध पदार्थांमुळे चर्चेत असतात मात्र यंदा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. एअर इंडीयाने दिलेल्या ब्रेकफास्टवर संजीव कपूर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

संजीव कपूर यांनी नागपूर ते मुंबई प्रवास केला या दरम्यान त्यांना एअर इंडीयाने दिलेला ब्रेकफास्ट पाहून भारतीयांनी ब्रेक फास्टला हेच खायला हवे का असा सवाल? असा सवाल उपस्थित केला आहे.

तो माझा खूप चांगला मित्र.. Laxmikant Berde ची आठवण शेयर करताना Anil Kapoor झाले भावुक

नेमकं घडलं तरी काय?

संजीव कपूर आपल्या सोशल अकाऊंट्स वर एअर इंडीयाने त्यांना सर्व्ह केलेल्या नाश्त्याचा फोटोच ट्वीट केला आहे. त्यामध्ये, थंड चिकन टीक्का, कलिंगड काकडी, कोबीचे पान असे अनेक विविध प्रकार दिसत आहेत. या खाद्यपदार्थांचे फोटो शेअर करताना संजीव यांनी तिखट शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

थंड पडलेला चिकन टीक्का, सॅंडविचला पुरेसे फिलींग लावलेले नव्हते. डेझर्ट शुगर सिरप सारखे होते असे ट्वीटरवरील तक्रारीत त्यांनी म्हटले आहे. नागपूर ते मुंबई फ्लाईट क्रमांक – 0740 असा ब्रेक फास्ट दिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Prateik Babbar : 'आमचं नातं कुणाला सांगायचं नव्हतं!' स्मिता पाटील यांच्या प्रतिकची गर्लफ्रेंड आहे तरी कोण?

थंड चिकन टीक्का, कलिंगड काकडी, कोबीच्या पानाला मायो लावून त्यावर शेवचे तुकडे आणि काही फिलींग न केलेल्या सॅंडविचचा फोटो त्यांनी शेअर केला आहे. आणि एअर इंडीला त्यांनी जागे व्हा असा सल्ला दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com