indian army
indian army

J&K: लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरसह दोघांचा खात्मा

Summary

जम्मू-काश्मीरमध्ये शोपियांमध्ये सुरक्षा दलांनी चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरचा खात्मा केला आहे.

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरमध्ये शोपियांमध्ये सुरक्षा दलांनी चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरचा खात्मा केला आहे. हा दहशतवादी पूर्वी जम्मू-काश्मीरच्या पोलीस दलात होता, चारवर्षांपूर्वी त्याने नोकरी सोडली होती आणि तो दहशतवादी झाला होता. दक्षिण काश्मीरमध्ये शोपिया जिल्ह्यात रात्री झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात आलं. यात इश्फाक डार याचाही समावेश होता. श्रीनगरमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत दोन स्थानिक दहशतवाद्यांना मारण्यात यश आलं होतं. (Top Lashkar e Taiba commander killed in encounter in Jammu kashmir Shopian)

काश्मीर पोलीस प्रमुख (आयजीपी) विजय कुमार म्हणाले की, इश्फाक डार उर्फ अबू अकरम 2017 मध्ये या प्रदेशातील सर्वाधिक सक्रिय दहशतवाद्यांपैकी एक होता. पोलीस, लष्कर आणि केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या माध्यमातून चालवण्यात आलेल्या संयुक्त ऑपरेशनमध्ये त्याला मारण्यात आलं आहे. दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर शोपियांमध्ये सुरक्षा दलांनी संयुक्त ऑपरेशन राबवले. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झालाय. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑपरेशन अजूनही सुरु आहे.

indian army
ब्रिटनने सर्व कोरोना निर्बंध हटवले; धाडस कशाच्या जीवावर?

दरम्यान, याआधी पाकिस्तानच्या ‘लष्करे तोयबा’ या संघटनेचा म्होरक्या एजाझ ऊर्फ अबू हुरैरा याच्यासह तीन दहशतवादी बुधवारी चकमकीत ठार झाले होते. जम्मू- काश्‍मीरमधील पुलवामा भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. हुरैरा हा श्रीनगर व पुलवामात सक्रिय होता. पुलवामा शहरात सुरुवातीला चकमक झाली. मारले गेलेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रे व दारूगोळा जप्त करण्यात आला होता. दहशतवाद्यांचा एक गट त्यांच्‍या संपर्क सूत्रांना भेटण्यासाठी पुलवामाला आल्याची माहिती मिळाल्याने संबंधित भागात घेराव घालण्यात आला. यावेळी तेथील दहशतवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. पोलिसांनी तेथे नाकाबंदी करून गोळीबाराने प्रत्युत्तर दिले. यात तीन दहशतवादी ठार झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com