esakal | युवती 'टॉपलेस' अवस्थेत चालत निघाली अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

topless girl was roaming on the road at kolkata

एका युवतीने मित्रासोबत दारू प्यायली. दारूची नशा चढल्यानंतर तिने अंगातील टॉप काढला आणि तशाच अवस्थेत रस्त्यावरून चालत निघाली. एक तासानंतर महिला पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. शहरातील रेड रोडवर ही घटना घडली.

युवती 'टॉपलेस' अवस्थेत चालत निघाली अन्...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कोलकाता : एका युवतीने मित्रासोबत दारू प्यायली. दारूची नशा चढल्यानंतर तिने अंगातील टॉप काढला आणि तशाच अवस्थेत रस्त्यावरून चालत निघाली. एक तासानंतर महिला पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. शहरातील रेड रोडवर ही घटना घडली.

...तरी पण लग्न केले; दुसऱयाच दिवशी मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक युवती मित्रासोबत मैदानावर दारू पिण्यासाठी बसली होती. दारूची नशा चढल्यानंतर उर्वरीत साहित्य घटनास्थळीच सोडले आणि टॉपलेस होऊन रस्त्यावरून चालत निघाली. याबाबतची माहिती समजल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तिला कपडे घालण्यासाठी विनवणी केली. पण, ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. अर्धनग्न अवस्थेत तशीच चालत राहिली. महिला पोलिस नसल्यामुळे पोलिसांना तिच्या जवळ जाता येत नव्हते. अखेर पोलिसांनी महिला पोलिसांना बोलावून घेतल्यानंतर तिला ताब्यात घेतले.

Video: बैलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल...

युवतीची माहिती घेतल्यानंतर समजले की, तिच्या वडिलांचा 2010 मध्ये मृत्यू झाला आहे. आई आणि भावासोबत ती पद्मपुकूर परिसरात राहाते. तिच्या कुटुंबियांना याबाबत माहिती देण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

loading image