esakal | Video: बैलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल...
sakal

बोलून बातमी शोधा

ox can be seeing lifting a cart of grass on his own video viral

एका बैलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून या बैलावर प्रतिक्रिया नोंदवत आहेत. पश्चिम दिल्लीचे खासदार प्रवेश साहिब सिंह वर्मा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

Video: बैलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्लीः एका बैलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून या बैलावर प्रतिक्रिया नोंदवत आहेत. पश्चिम दिल्लीचे खासदार प्रवेश साहिब सिंह वर्मा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

...तरी पण लग्न केले; दुसऱयाच दिवशी मृत्यू

खासदार प्रवेश साहिब सिंह वर्मा यांनी व्हिडिओ शेअर करताना 'Mesmerising' असे शीर्षक दिले आहे.  'Mesmerising' म्हणजे मंत्रमुग्ध. लाखो नेटिझन्सनी हा व्हिडिओ पाहताना ट्विट केला आहे. शिवाय, प्रतिक्रियाही नोंदविल्या आहेत. बैल स्वत:च बैलगाडी खांद्यावर घेतो आणि पुढे जाताना दिसत आहे. दरम्यान, बैलजोडी स्वःता कोळपणी करत असल्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियासाठी प्रसिद्ध असलेले फेसबुक, व्हॉट्सऍप आणि ट्विटरवरून हे व्हिडिओ व्हायरल होते आहेत. दरम्यान, ग्रामीण भागात बैलांना महत्त्व आहे. शेतकरी बैलांवर जीवापाड प्रेम करत असल्याचे पाहायला मिळते. बैलही आपल्या मालकासाठी कठीनप्रसंगी धावून जात असल्याचे अनेकदा पाहायला मिळते.

loading image
go to top