कासव पुन्हा जिंकले; व्हिडिओ पाहाच...

वृत्तसंस्था
Thursday, 17 September 2020

ससा आणि कासवाची गोष्ट सर्वांनाच माहित आहे. दोघांच्या शर्यतीत कासव जिंकल्याची गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आहोत. पुन्हा एकदा कासव जीवनाची लढाई जिंकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नवी दिल्ली: ससा आणि कासवाची गोष्ट सर्वांनाच माहित आहे. दोघांच्या शर्यतीत कासव जिंकल्याची गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आहोत. पुन्हा एकदा कासव जीवनाची लढाई जिंकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Video: वृद्ध महिलेला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण

मगर आणि कासव खरं तर दोन्ही उभयचर प्राणी. पण, मगरीने कासवाची शिकार करण्याचा प्रयत्न केला पण कासवाने आपली अलगद सुटका करून घेतली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक मगर उन्हात बसलेली दिसते. समोरून कासव येताना दिसल्यानंतर मगर त्याला खाण्याचा प्रयत्न करते. कासव आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करते. कासवाने आपले अंग आपल्या कवचाच्या आत दुमडून घेतले. पण, मगर शिकार करण्याचा प्रयत्न करत होती. मगरीने कासवाला खाण्याचा प्रयत्न केला. पण, अपयशी ठरली. कासव मगरीच्या तोंडातून बाहेर आले आणि आपला जीव वाचवून निघून गेले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tortoise again win mouth of the crocodile video viral