esakal | Coronavirus : देशात कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ; रुग्णांची संख्या...
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus : देशात कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ; रुग्णांची संख्या...

- जगभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस होतीये वाढ.

Coronavirus : देशात कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ; रुग्णांची संख्या...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या विषाणूचा फैलाव देशातही होत असून, ओडिशा, महाराष्ट्र आणि आता पश्चिम बंगालसह इतर राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. यातील काही रुग्ण भारताबाहेरील असल्याचे समोर आले आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

लडाख, जम्मू काश्‍मीर, केरळ येथे नव्याने प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 147 झाली आहे. यातील 122 नागरिक भारतीय असल्याचे समोर आले आहे. इतर 25 जण परदेशातून भारतात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे. याबाबतचे पत्रक काढण्यात आले आहे.  

वुहानमध्ये नोव्हेंबरमध्येच आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

तीन नागरिकांचा मृत्यू

कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, आत्तापर्यंंत देशातील तीन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. 

कोलकात्यात पहिला रुग्ण

कोलकाता येथे पहिला रुग्ण आढळला. कोरोनाबाधित युकेतून पुन्हा मायदेशी आला आहे. त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी त्याला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. या तरुणाच्या पालकांना विलगीकरण कक्षात नेण्यात आले आहे.