esakal | Coronavirus : देशात कोरोनाग्रस्तांची संख्या १६०० पार; कोणत्या राज्यात किती रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Total number of COVID19 positive cases rise to 1613 in India

जगभरात कोरोना व्हायरसच्या विषाणूंनी थैमान घातलेले असताना भारतातही या विषाणूंचा फैलाव होण्यास सुरुवात झाली आहे. रुग्णांची संख्याही आता देशात वाढताना दिसत आहे. देशात सध्या कोरोनाचे एकूण १६१३ रुग्ण आहेत. तर आतापर्यंत एकूण ३५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत एकूण १४८ रुग्णांना बरे करण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

Coronavirus : देशात कोरोनाग्रस्तांची संख्या १६०० पार; कोणत्या राज्यात किती रुग्ण

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसच्या विषाणूंनी थैमान घातलेले असताना भारतातही या विषाणूंचा फैलाव होण्यास सुरुवात झाली आहे. रुग्णांची संख्याही आता देशात वाढताना दिसत आहे. देशात सध्या कोरोनाचे एकूण १६१३ रुग्ण आहेत. तर आतापर्यंत एकूण ३५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत एकूण १४८ रुग्णांना बरे करण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्ली, महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत. महाराष्ट्रात मंगळवारी COVID-19 चे 72 नवे रूग्ण आढळून आले. त्यानंतर महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 300 पार गेला आहे. केरळमध्ये कोरोना व्हायरसचे सात नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर Coronaचा संसर्ग झालेल्यांची संख्या 241वर पोहोचली आहे. तमिळनाडूमध्ये 55 नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 50 रूग्ण दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. त्यामुळे राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांचा आकडा 124 वर पोहोचला आहे.

देशात तुटवडा असताना भारताकडून सर्बियाला वैद्यकीय उपकरणांची निर्यात

देशाची राजधानी दिल्लीमध्येही 23 नवे रूग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 23 नवे रूग्ण आढळल्यामुळे शहरात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 120 झाली आहे. देशातील इतर राज्यांबाबत बोलायचे झाले तर कर्नाटकात 101, उत्तर प्रदेशमध्ये 101, राजस्थानमध्ये 93, गुजरातमध्ये 74, मध्य प्रदेशमध्ये 66, जम्मू-काश्मीरमध्ये 55, हरियाणामध्ये 43, पंजाबमध्ये 41, आंध्रप्रदेशमध्ये 40, पश्चिम बंगालमध्ये 27, बिहारमध्ये 21, चंदिगढमध्ये 13, लढाखमध्ये 13, अंदमान निकोबारमध्ये 10, छत्तीसगढमध्ये 8, उत्तराखंडमध्ये 7, गोव्यामध्ये 5, हिमाचलप्रदेशमध्ये 3, ओदिशामध्ये 3, आसाम, झारखंड, मणिपूर, मिझोरम आणि पद्दुचेरी येथे प्रत्येकी एक एक कोरोना बाधितव आढळून आले आहेत.

कोरोनाशी लढण्यासाठी डॉक्टरांना रेनकोट आणि मिठाई आवश्यक

दरम्यान, देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल डिस्टन्सिंगही पाळण्यास सांगितलं आहे. अत्यावश्यक सेवा यातून वगळण्यात आल्या आहेत. मात्र लोकांनी किराणा दुकानं, भाजी बाजार, मेडिकल स्टोअर्स या ठिकाणी गर्दी किंवा झुंबड करु नये असंही आवाहन केंद्र आणि राज्य सरकारतर्फे करण्यात आलं आहे. जे लोक लॉकडाउनचे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर नाईलाजाने कारवाई करावी लागेल. मात्र तशी वेळ आणू नका असंही आवाहन सरकारने केलं आहे.