Leopard
Leopardsakal

Leopard : पर्यटकांनी घेतला चित्ता सफारीचा अनुभव; कुनोत पाच दिवस फेस्टिव्हल

कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देणाऱ्या पर्यटकांनी बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्ता सफारीचा आनंद घेतला.

श्‍योपूर (मध्य प्रदेश) - कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देणाऱ्या पर्यटकांनी बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्ता सफारीचा आनंद घेतला. निमित्त होते १७ डिसेंबरपासून सुरू झालेल्या ‘कुनो फॉरेस्ट फेस्टिव्हल’चे. हा फेस्टिव्हल गुरुवारी (ता.२१) संपणार आहे. यानुसार देशातील पहिल्या चित्ता सफारीचे आयोजन करण्यात आले.

राष्ट्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने काही दिवसांपूर्वी मंजुरी दिल्यानंतर चित्ता सफारीचा कुनो फेस्टिव्हलमध्ये समावेश केला. गेल्या चार दिवसांत असंख्य पर्यटकांनी चित्ता सफारीचा आनंद घेतला.

श्‍योपूर जिल्ह्यातील राणीपुरा (सेसईपुरा) येथील कुनो राष्ट्रीय उद्यान आता ‘टेंट सिटी’ झाली आहे. या ठिकाणी पर्यटकांसाठी ५० स्विस टेंट उभारण्यात आले असून ते सर्वसोयींनीयुक्त आहेत. एका खासगी कंपनीच्या सहकार्याने कुनो फॉरेस्ट फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आणि त्याचा वन्यप्रेमी पर्यटकांनी लाभ घेतला. जंगलात ‘नाईट वॉक’ करणाऱ्या पर्यटकांना दुसऱ्या दिवशीही राष्ट्रीय उद्यानात भटकंती करण्याची मूभा होती.

पर्यटकांनी जंगलातील विविध प्रजातींच्या पक्ष्यांचे आणि वन्यजीवांचा अविस्मरणीय अनुभव घेतला. पर्वतरांगा, चिंचोळ्या वाटा, दगडधोंड्यातून वाट काढत पर्यटकांनी समृद्ध जैवविविधतेचा आणि शांततेचा अनुभव घेतला. चोहोबाजूंनी पर्वतरांगांनी वेढलेला परिसर पाहून पर्यटकही भारावले.

प्रोजेक्ट चित्ता

केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी ‘प्रोजेक्ट चित्ता’ नुसार यावर्षी मार्च ते जुलैदरम्यान, चित्त्यांना जंगलात सोडून देण्यात आले. मात्र एकानंतर एक चित्त्यांचा मृत्यू होऊ लागल्याने त्यांना पुन्हा त्यांच्या अधिवासात आणण्यात आले. १३ ऑगस्टला शेवटचा चित्ता ‘निर्वा’ याला देखील अधिवासात आणले.

त्यामुळे गेल्या १२५ दिवसांपासून (१३ ऑगस्ट ते १७ डिसेंबर) या काळात सर्व चित्ते अधिवासात होते. त्यांना पुन्हा रविवारी पुन्हा जंगलात सोडण्यात आले. सध्या दोन नर चित्ते ‘वायू’ आणि ‘अग्नी’ यांना कुनोच्या जंगलात आहेत. कुनोत सध्या चौदा प्रौढ चित्ते आणि एक बछडाही आहे.

‘बलून’ची दोरी अचानक तुटली

कुनो राष्ट्रीय उद्यानात मंगळवारी एक दुर्घटना टळली. कुनो जंगल उत्सव सुरू असताना हॉट एअर बलूनची दोरी तुटली. त्यामुळे बलूनवरचे नियंत्रण सुटले आणि हा बलून शिवपुरी जिल्ह्यातील परासरी जंगलात उतरविण्यात आला. हॉट एअर बलूनमध्ये दोन पर्यटक आणि एक ऑपरेटर होता. तिघेही सुरक्षित असल्याचे वन्यविभागाने सांगितले.

कुनो नॅशनल पार्कमध्ये १७ ते २१ डिसेंबरपर्यंत कुनो फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलमध्ये ड्यू सायकलिंग, जंगल सफारी, नाईट जंगल वॉक, जीप लाइन, पेंट बॉल, ट्रेकिंग, पॅरासिलिंग, हॉट एअर बलून, पॅरामोटरिंगसारख्या उपक्रमांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com