

दिल्ली-एनसीआरमधील फरिदाबादमध्ये एक वेदनादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने चार मुलांसह जीवन संपविले आहे. या व्यक्तीने आपल्या चार अल्पवयीन मुलांसह ट्रेनसमोर उडी मारली. या घटनेत वडिलांसह चार निष्पाप मुलांचाही मृत्यू झाला. ट्रेनच्या लोको पायलटने सांगितले की, ट्रॅकवरून चालत असताना ट्रेन जवळ आली तेव्हा त्या व्यक्तीने ट्रॅकवर उडी मारली आणि सर्वांचा मृत्यू झाला.