मोबाईल क्रमांक ११ आकडी होणार नाही; ट्रायने दिलं स्पष्टीकरण

वृत्तसंस्था
सोमवार, 1 जून 2020

मोबाईल क्रमांक १० वरून ११ आकडी केला जाणार असे वृत्त काही माध्यमांनी दिल्यावर स्वतः ट्रायने समोर येत यावर स्पष्टीकरण देत पडदा टाकला आहे.

नवी दिल्ली : मोबाईल क्रमांक ११ आकडी होणार नसल्याचे भारतीय दूरसंचार प्राधिकरणाने (ट्राय) स्पष्टीकरण दिले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मोबाईल क्रमांकाच्या आकडेवारीवरून चर्चा सुरू होती. मोबाईल क्रमांक १० वरून ११ आकडी केला जाणार असे वृत्त काही माध्यमांनी दिल्यावर स्वतः ट्रायने समोर येत यावर स्पष्टीकरण देत पडदा टाकला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

असा कोणताही निर्णय घेण्यात आलेले नाही. मोबाईल क्रमांक हा १० आकडीचं राहणार असल्याचा खुलासा ट्रायकडून करण्यात आला आहे. ट्रायने यासंदर्भातील परिपत्रक जारी करत हा खुलासा केला आहे. लँडलाईन आणि मोबाईल सेवेच्या क्रमांकांबद्दल पुरेशी संसाधनं निश्चित करण्याबाबतच्या शिफारशींवर ट्रायने शुक्रवारी चर्चा केली होती. मात्र या शिफारशींचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. मोबाईल क्रमांक ११ आकडी ठेवण्याची कोणतीही शिफारस ट्रायने केली नव्हती. तर ही शिफारस या आधीच फेटाळून लावण्यात आली होती. त्यामुळे मोबाईल क्रमांक हा १० आकडीचं राहील असे ट्रायने स्पष्ट केले आहे.
------
कोरोनाग्रस्तांच्या यादीत भारत आता सातव्या स्थानी; कोणाला टाकले मागे?
------
आंदोलन चिघळले; ट्रम्प व्हाईट हाऊसमल्या संरक्षण बंकरमध्ये हलविले
------

१० क्रमांकाच्या आकड्यांपूर्वी ९ हा क्रमांक लावावा लागणार असून असे केल्याने देशात एकूण १ सहस्र कोटी क्रमांकांची उपलब्धता होणार आहे. मोबाईलची वाढती मागणी लक्षात घेऊन भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) मोबाईल आणि लॅण्डलाईनच्या क्रमांक प्रणालीत बदल करण्याच्या योजनेवर विचार करत असल्याचे माध्यमांतून बोलले गेले होते. नवीन क्रमांक संसाधनांचा ७० टक्के वापर केल्यास, २०५० पर्यंत देशातील कार्यरत मोबाईल फोनची सेवा कायम ठेवण्यासाठी १० आकडी क्रमांक पुरेसे ठरणार नसल्याचे ट्रायकडून सांगितले गेले असल्याचे बोलले जात होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TRAI Not Recommending 11 digit Mobile Numbering Plan Says 10 digit Numbers to Continue

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: