PUBG खेळणं जीवावर बेतलं, फिरायला गेलेल्या दोघांचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gaurav And Kapil

PUBG खेळणं जीवावर बेतलं, फिरायला गेलेल्या दोघांचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू

sakal_logo
By
टीम ई सकाळ

आग्रा : पब्जी (PUBG online game) खेळणे दोन मुलांच्या जीवावर बेतले आहे. मॉर्निंग वॉकला जाताना गेम खेळण्यात व्यस्त असताना दोन मुलांना रेल्वेने चिरडले. मथुरेतील (Mathura) लक्ष्मीनगरात ही घटना घडली असून त्यांचा मृत्यू झाल्यानंतरही मोबाईलवर पब्जी गेम सुरूच होता. दोन्ही मुलं अभ्यासात अतिशय हुशार होते. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीय तसेच शिक्षकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

हेही वाचा: ...अन् शवागाराच्या फ्रिजरमध्ये ठेवलेला मृत माणूस ७ तासानंतर झाला जीवंत

गौरव कुमार आणि कपिल कुमार असे दोन्ही मृत मुलांची नावे असून दोघेही दहावीचे विद्यार्थी होते. दोघेही वर्गामध्ये अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. गौरवने मॉर्निंग वॉकला जातो, असं घरी सांगितलं. त्यानंतर तो कपिलला उठवायला गेला. मात्र, झोपेत असल्यामुळे तो मॉर्निंक वॉकला जायला तयार नव्हता. तरीही गौरव त्याला घेऊन मॉर्निंग वॉकला गेला. यावेळी दोघेही पब्जी गेम खेळत होते. त्यामुळे रेल्वे ट्रॅक ओलांडताना रेल्वेकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. काही क्षणातच दोघांनाही रेल्वेने चिरडले. सकाळी ७ च्या सुमारास काही पादचारी जात असताना त्यांना दोन्ही मृतदेह रेल्वेच्या ट्रॅकवर पडून दिसले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता एक मोबाईल गौरव आणि कपिलसोबत रेल्वेखाली चिरडला गेला होता आणि दुसऱ्या मोबाईलवर पब्जी गेम सुरू होता. पण, नेमकं कोणत्या ट्रेनने त्यांना चिरडलं, हे माहिती नसल्याचं पोलिस म्हणाले.

हेही वाचा: सोबत राहण्यास नकार दिल्याने प्रियकरावर अ‌ॅसिड हल्ला, महिलेला अटक

...अन् वडिलांनी फोडला टाहो -

''माझ्या मुलाने मॉर्निंग वॉकला जायचं ठरवलं होतं. त्यासाठी सकाळीच उठविण्यास सांगितले होते. त्यानुसार आम्ही त्याला सकाळीच उठवले. आजचा त्याचा मॉर्निंग वॉकचा पहिला दिवस होता. मात्र, तोच दिवस शेवटची ठरला'', असं म्हणत गौरवच्या वडिलांनी टाहो फोडला. आम्हाला या पब्जी गेमबाबत कुठलीही माहिती नव्हती. मला हे माहिती असते तर मी त्याला मोबाईल कधीच दिला नसता, असं कपिलचे वडील म्हणाले.

loading image
go to top