Train Luggage Rules 2026
esakal
रेल्वेने प्रवास करणाऱ्या खेळाडूंसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता भालाफेकीसारख्या स्पर्धांमध्ये वापरले जाणारे मोठ्या आकाराचे क्रीडा साहित्य रेल्वेत सोबत नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने यासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून, त्यामुळे देशभरातील खेळाडूंना स्पर्धांसाठी प्रवास करताना मोठा फायदा होणार आहे.