Coronavirus : देशातील अनेक राज्यांमधील व्यवहार थांबले

States
States

महाराष्ट्र, पंजाबमध्ये संचारबंदी; अन्य ठिकाणी टाळेबंदी, जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी
नवी दिल्ली - देशात कोरोना व्हायरस वेगाने पसरत असून, सोमवारी मृतांची संख्या सात झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्याही ४२८ वर पोचली आहे. महाराष्ट्र, पंजाबमध्ये संचारबंदी लागू केली असून उत्तर प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळमधील अनेक राज्यांमध्ये संपूर्णपणे टाळेबंदी केलेली आहे. या विषाणूने बाधित नवे रुग्ण आढळत असल्याने केंद्र आणि राज्य सरकारने देशभरातील ८० जिल्हे संपूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतही आज सकाळपासून ३१ मार्च रोजी मध्यरात्रीपर्यंत अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.

गुजरातमध्ये बाधितांची संख्या ३० 
अहमदाबाद -
 गुजरातमध्ये आज नव्याने १२ रुग्णांची भर पडली असल्याचे राज्य आरोग्य विभागाने सांगितले. येथील बाधितांची संख्या ३० झाली आहे.

  • नव्या रुग्णांमध्ये पाच पुरुष आणि सहा महिलांचा समावेश
  • पाच जणांना स्थानिक संक्रमाणातून बाधा
  • सहा रुग्ण सौदी अरेबिया, फ्रान्स, श्रीलंका आणि ब्रिटनहून परतले होते
  • अहमदाबादमधील रुग्णांची संख्या १३, बडोद्यात सहा; सुरत, गांधीनगरमध्ये प्रत्येकी चार; तर कच्छ आणि राजकोटमध्ये प्रत्येकी एक रुग्ण
  • आत्तापर्यंत या विषाणूंमुळे सुरत येथील ६७ वयाच्या एका रुग्णाचा रविवारी (ता. २२) मृत्यू झाला

मध्य प्रदेशमध्ये ३५ जिल्ह्यांत टाळेबंदी
भोपाळ -
 मध्य प्रदेशातील ३५ जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत टाळेबंदी जाहीर केलेली आहे. याचा कालावधी तीन एप्रिलपर्यंत असेल. 

  • भोपाळ, टिकारामगड, दिंडोरी, रायसेन, राजगड, छत्तरपूर, दातिया, मोरेना, होशंगाबाद, उमारिया आणि अन्नोपूर आदी ठिकाणी ३१ मार्चपर्यंत बंद
  • अन्य ठिकाणी ‘बंद’चा कालावधी वेगवेगळा, या सर्व भागांत जमावबंदीचा आदेश लागू
  • आत्तापर्यंत सहा जणांना लागण झाल्याचे निदान
  • जबलपूरमधील पाच, तर भोपाळचा एक रुग्ण 
  • सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे राज्याचे प्रभारी आरोग्य अधिकारी तरुण भानोत यांचे प्रतिपादन
  • जबलपूरच्या पाच रुग्णांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या चार हजार नागरिकांशी संपर्क; यापैकी ज्यांचा शोध लागला त्यांना एकांतवासात राहण्याचे निर्देश
  • आत्तापर्यंत ७५ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले 
  • चाचणीत सहा जणांना संसर्ग झाला असल्याचे निदान झाले असून, ४८ नमुने ‘निगेटिव्ह’ आले आहेत. २१ नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे

ओडिशात चार जणांवर गुन्हा
भुवनेश्‍वर -
 ओडिशा सरकारने जाहीर केलेल्या विलगीकरण नियमांचे पालन न करणाऱ्या चार जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात भुवनेश्‍वरमधील एका दांपत्याचाही समावेश आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त अनुप साहू यांनी आज दिली. 

  • विदेशातून आलेल्या दांपत्याने घरात एकांतवासात राहण्याच्या निर्देशाचे पालन केले नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल
  • संबंधित दांपत्याला विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे
  • दुसऱ्या घटनेत उझबेकिस्तानहून आलेल्या ३० वर्षांच्या व्यक्तीवरही गुन्हा दाखल
  • घरात एकांतवासात राहण्याचा आदेश न पाळल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार

तमिळनाडूतही जमावबंदी
चेन्नई -
 कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तमिळनाडू ३१ मार्चपर्यंत लॉकडाउन असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री के. पल्लानीस्वामी यांनी सोमवारी केली. राज्यात १४४ कलम काटेकोरपणे लागू केले जाईल, असेही ते म्हणाले.

  • राज्यात ‘कोविड-१९’ रुग्णांची संख्या ९ झाली 
  • अत्यावश्‍यक सेवा वगळता सार्वजनिक आणि खासगी वाहनांना रस्त्यांवर येण्यास बंदी
  • परदेशातून आलेल्या प्रवाशांनी संसर्ग रोखण्यासाठी होम क्वारंटाइनचा पर्याय स्वीकारावा.

अरुणाचल प्रदेशात दोघे ‘निगेटिव्ह’
इटानगर -
 अरुणाचल प्रदेशातील दोन संशयित रुग्णांच्या घशातील द्राव (स्वॅब) आणि रक्ताच्या नमुन्यांमधून त्यांना कोरोना व्हायरसच्या संसर्गाची लागण झाली नसल्याचे निदान झाले, अशी माहिती वरिष्ठ आरोग्य अधिकारी डॉ. लॉबसंग जम्पा यांनी आज दिली

  • दोन संशयितांचे नमुने आसाममधील गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आणि दिब्रुगडच्या प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्रात पाठविण्यात आले आहे. 
  • त्यांना ‘कोरोना’चा संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट
  • दोघांना विलगीकरण कक्षात तर १३ जणांना घरीच एकांतवासात ठेवले आहे
  • राज्यातील सीमांवर १.२० लाख प्रवाशांची तपासणी, रेल्वे स्थानक व विमानतळावरही नजर
  • आंतरराज्यीय वाहतूक आणि रेल्वेसेवा अनिश्‍चित काळासाठी बंद 
  • युरोपमधून नहरलागून येथे आलेले दांपत्य घरात एकांतवासात 

तेलंगणमध्ये दुकानांमध्ये गर्दी
हैदराबाद -
 तेलंगण सरकारने मार्च ३१ पर्यंत राज्यात टाळेबंदी जाहीर केल्यानंतर आज जीवनावश्‍यक वस्तू घेण्यासाठी हैदराबादमध्ये नागरिकांची मोठी गर्दी झाली. राज्यात आज तीन नवे रुग्ण आढळले. यामुळे रुग्णांची एकूण संख्या ३० झाली आहे.

  • नवे तीन बाधित रुग्ण हे २१ ते ३० वर्षे वयोगटातील आहेत
  • भाजीपाला आणि अन्य जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी आज सकाळी सहापासून गर्दी
  • राज्यातील बाधित रुग्णांची आत्तापर्यंतची संख्या २७
  • टाळेबंदीमधून राज्याच्या सीमा बंद
  • घरात एकांतवासात राहण्याचे निर्देश ज्यांना दिले आहेत, त्याचे पालन न केल्यास दंडात्मक शिक्षा आणि त्यांना सरकारी रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवणार
  • राज्यातील ८७.५९ लाख अन्नसुरक्षा कार्डधारकांना प्रत्येकी १२ किलो तांदूळ पुरविणार. याअंतर्गत एक हजार १०३ कोटी रुपयांचे ३.५८ लाख टन तांदूळ वितरण होणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com