तृणमूलने सीमा सुरक्षा दलावरच डागली तोफ

वृत्तसंस्था
Friday, 22 January 2021

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने आत्ताच निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. तृणमूलने सीमा सुरक्षा दलावरच तोफ डागली.

कोलकता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने आत्ताच निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. तृणमूलने सीमा सुरक्षा दलावरच तोफ डागली. एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या बाजूने मतदान करावे म्हणून सीमावर्ती भागांत जनतेला धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप तृणमूलने केला.

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या नेतृत्वाखालील पूर्ण पीठ बुधवारी सायंकाळी बंगालमध्ये दाखल झाले. त्यांचा दौरा तीन दिवसांचा आहे. मतदानाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस पार्थ चटर्जी यांनी सांगितले की, सीमा सुरक्षा दल मतदारांना धमक्या देत असल्याची माहिती आम्ही मुख्य निवडणूक आयुक्त आणि आयोगाच्या इतर अधिकाऱ्यांना दिली आहे. निमलष्करी दलाचे अधिकारी विविध गावांना भेट देत असून लोकांना धमकावत असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे.

'हम तेजस्वी यादव बोल रहे हैं, DM साहब'; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

आयोगाचे अधिकारी केंद्रीय तसेच राज्य नियमन संस्थांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहेत. विभागीय आयुक्त आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली जाईल.

भारतीय जनता पक्षाचा ध्वज हातात घेऊन कार्यक्रमात सहभागी झालेल्यांनी दिलेल्या घोषणांचे पक्ष समर्थन करीत नाही.
- शमिक भट्टाचार्य, भाजप राज्य प्रवक्ते

काँग्रेस शोधतेय राहुल गांधींना पर्याय; अध्यक्षपदाच्या शर्यतीत ज्येष्ठ नेता

सीमावर्ती भागांत तुमची काळजी घेण्यासाठी इतर कुणीही नव्हे तर आम्हीच राहणार आहोत असे सीमा सुरक्षा दलाचे जवान गावकऱ्यांना सांगत आहेत. ही परिस्थिती गंभीर असून निवडणूक आयोगाने याची दखल घेतलीच पाहिजे.
- पार्थ चटर्जी, तृणमूलचे सरचिटणीस

केंद्रीय सुरक्षा दलांच्या मदतीचा परिणामकारक वापर निवडणूक आयोगाने करून घ्यावा असे डाव्या पक्षाचे आवाहन आहे. निवडणूका मुक्त आणि न्याय्य पद्धतीने होण्यास अनुकूल वातावरण आयोगाने निर्माण केले पाहिजे.
- रबीन डेब, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: trinamool congress Border Security Force