esakal | नुसरत जहाँ यांनी ममता बॅनर्जींसाठी केलं खास टि्वट

बोलून बातमी शोधा

तृणमुल खासदार नुसरत जहाँ
नुसरत जहाँ यांनी ममता बॅनर्जींसाठी केलं खास टि्वट
sakal_logo
By
दीनानाथ परब

कोलकात्ता: पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमुल काँग्रेस सरकार स्थापन करण्याच्या स्थितीमध्ये आहे. आतापर्यंत मतमोजणीचे जे काल हाती आलेत, त्यानुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमुलकडे २०० पेक्षा जास्त जागांची आघाडी आहे. भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी पूर्ण ताकत पणाला लावली होती. २०० पेक्षा जास्त जागा जिंकू असा दावा भाजपाकडून करण्यात येत होता. पण प्रत्यक्षात भाजपाकडे ८० पेक्षा जास्त जागांची आघाडी आहे.

मतमोजणीच्या काही फेऱ्या अजून बाकी आहेत. त्यामुळे चित्र काही प्रमाणात बदलू शकते. फक्त भाजपा आता १०० च्या जवळपास पोहोचणार का? ते महत्त्वाचे असेल. पश्चिम बंगलाच्या जनतेने ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. भाजपाने पश्चिम बंगालमध्ये आपण सरकार बनवण्याच्या स्थितीमध्ये आहोत, असे चित्र निर्माण केले होते. पण वस्तुस्थिती तशी नाहीय. पण भाजपाच्या दृष्टीने एक सकारात्मक बाब आहे. ती म्हणजे भाजपाला २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत फक्त तीन जागा मिळाल्या होत्या. त्याच भाजपाकडे आता ८० पेक्षा जास्त जागांची आघाडी आहे.

हेही वाचा: Live : एकटा द्रमुक स्पष्ट बहुमताच्या दिशेने

एकेकाळी पश्चिम बंगाल हा डाव्याचा गड समजला जायचा. पण प्रत्यक्षात आज बंगालमध्ये डावे आणि काँग्रेस नाममात्र उरले आहेत. भविष्यात भाजपाला इथे सबळ विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याची संधी आहे. निकालाचे चित्र आता हळूहळू स्पष्ट झाले असून तृणमुलच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन जल्लोष सुरु केला आहे.

हेही वाचा: Live: ममतांच्या विजयानंतर शरद पवारांचे ट्विट

तृणमुलच्या सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या खासदार नुसरत जहाँ यांनी सुद्धा पक्षाच्या विजयाबद्दल एक टि्वट केले आहे. 'दीदी जियो दीदी' इतकेच त्यांनी टि्वट केले आहे. टि्वटसोबत वापरलेल्या हार्टच्या इमोजीमधुन त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. नुसरत जहाँ यांचे वैवाहिक आयुष्य सुद्धा सध्या चर्चेत आहे. एका अभिनेत्यासोबत त्यांचे नाव जोडले जात आहे.