esakal | Delhi Election : 'आप'ची दिल्लीत ताकद वाढली; 'या' पक्षाने दिला पाठिंबा
sakal

बोलून बातमी शोधा

Trinamool Congress supports AAP in Delhi polls
  • माझा निर्णय जनता घेईल : केजरीवाल
  • देशासाठी प्राण पणाला लावले : केजरीवाल

Delhi Election : 'आप'ची दिल्लीत ताकद वाढली; 'या' पक्षाने दिला पाठिंबा

sakal_logo
By
वृत्तसेवा

दिल्ली विधानसभा निवडणूक 2020
नवी दिल्ली : दिल्ली निवडणूकीत आम आदमी पक्षाची ताकद वाढली असून तृणमूल कॉंग्रेसने आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देण्याचे निश्चित केले असल्याचे तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी सांगितले आहे.

भारतात कोरोना विषाणूचा पहिला बळी; केरळमध्ये आढळला रुग्ण
 
तत्पूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज भाजपच्या ध्रुवीकरणाच्या प्रचाराला चोख प्रत्युत्तर देत सत्ताधारी पक्षाचे वाभाडे काढले. भाजप नेत्यांकडून केजरीवालांची तुलना थेट दहशतवाद्यांसोबत होत असताना, "मी दहशतवादी आहे की मायबाप जनतेचा पुत्र, हे दिल्लीतील जनता ठरवेल,' असे त्यांनी म्हटले आहे.

तावडेंचा दिल्लीत विनोद; प्रचारसभेतील 'गर्दी'वरून ट्रोल

केजरीवाल म्हणाले, "दिल्लीतील जनताच मी त्यांचा भाऊ आहे की मुलगा आहे की दहशतवादी, हे ठरवेल. याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचे सर्वाधिकार मी जनतेकडे सुपूर्त करीत आहे. देशासाठी मी प्राणाची बाजी लावली होती. तीव्र स्वरूपाचा मधुमेह असतानादेखील मी उपोषण केले होते. या मधुमेहाच्या आजारामुळेच मला रोज दिवसातून चारवेळा इन्सुलिन घ्यावे लागते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर इन्सुलिन घेणाऱ्या व्यक्तीने तीन ते चार तासदेखील काही खाल्ले नाही तर ती तत्काळ कोसळून मरण पावू शकते. अशा परिस्थितीमध्ये मी दोनदा आमरण उपोषण केले होते. यातील पहिले उपोषण हे पंधरा, तर दुसरे दहा दिवसांसाठी होते.''

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राजकीय आघाडीवर

  • तृणमूल कॉंग्रेसचा "आप'ला पाठिंबा
  • निवडणूक आयोगाची भाजपला नोटीस
  • "आप'चे नेते संजय सिंह, पंकज गुप्तांचे निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर आंदोलन
  • तिमारपूर भागात केजरीवालांचा रोड शो
  • आपच्या आठवडाभरात दिल्लीत आठ हजार सभा
  • दिल्लीचे पोलिस आयुक्त अमूल्य पटनाईक यांना मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता