2 वर्षांपूर्वी हिरावलेल्या जुळ्या मुली अखेर परतल्या पोटी!

twin babies
twin babiesesakal

दैवाने हिरावले...दैवानेच दिले अशी काहीशी घटना विशाखापट्टणम येथे घडली. काहींचा विश्वास बसणार नाही, आश्चर्यचकित होतील अशीच ही घटना...काही घटनांचे योगायोग अशा पद्धतीने जुळून येतात की तो एक जणू निसर्गाचा चमत्कारच आहे, असं वाटतं. काय घडलं नेमकं वाचा...

दैवाने हिरावले...दैवानेच दिले

15 सप्टेंबर 2019 ची ही घटना...त्याच दिवशी गोदावरी नदीत विशाखापट्टणच्या भाग्यलक्ष्मी, त्यांचा पती, सासू आणि जुळ्या मुली एका बोटने प्रवास करत होते. त्यावेळी अचानक मोठा अपघात झाला होता. बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत ही बोट उलटली आणि अपघात झाला. या अपघातात जुळ्या मुली आणि सासू या तिघींचा मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबातील तीन व्यक्ती गमावल्याने भाग्यलक्ष्मी आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचं आभाळच कोसळलं होतं. त्यातच जुळ्या मुली गेल्यामुळे मातेचा आक्रोश आवरेनासा झाला होता. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

twin babies
पर्म विद्यापीठावर दहशतवादी हल्ला, 8 जणांचा मृत्यू

ज्या दिवशी दुर्घटना घडली, त्याच दिवशी जुळ्या मुलींचा जन्म

या घटनेनंतर दु:खातून सावरता सावरता काही महिन्यांच्या काळ गेला. आणि दोघा दाम्पत्यांनी आयुष्याची नव्याने सुरुवात करत पुन्हा एकदा बाळाला जन्म द्यायचं त्यांनी ठरवलं. मात्र अनेक दिवस त्यांना मूल होत नव्हतं. कालांतराने IVF तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भाग्यलक्ष्मी यांना गर्भधारणा झाली. त्यांच्या पोटी पुन्हा जुळ्या मुली जन्माला आल्या आणि विशेष म्हणजे ज्या दिवशी दुर्घटना घडली होती, त्याच दिवशी जुळ्या मुलींचा जन्म झाला. 15 सप्टेंबर 2019 ला गोदावरी नदीत दुर्घटना घडली होती, तर 15 सप्टेंबर 2021 ला जुळ्या मुलींचा जन्म झाला. त्यामुळे ही आपल्या आय़ुष्यात मिळालेली दैवी देणगी तसेच एका चमत्कारापेक्षा कमी नसल्याची भावना दोघांनी व्यक्त केली आहे.

twin babies
'शाहरुख तुला इस्लामचा विसर पडला काय?' नेटकऱ्यांनी टोचलं...

बरोबर दोन वर्षांनी पुन्हा जुळ्या मुली

गोदावरी नदीत बोट उलटून घडलेल्या दुर्घटनेत आपल्या जुळ्या मुली गमावलेल्या कुटुंबाला बरोबर दोन वर्षांनी पुन्हा जुळ्या मुली झाल्या आहेत. जुळ्या मुली गमावल्याचं दुःख उरात घेऊन जगणाऱ्या एका जोडप्याला हा दैवी संकेत वाटत असून आपल्या मुली परत आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com