'शाहरुख तुला इस्लामचा विसर पडला काय?' नेटकऱ्यांनी टोचलं... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'शाहरुख तुला इस्लामचा विसर पडला काय?' नेटकऱ्यांनी टोचलं...

'शाहरुख तुला इस्लामचा विसर पडला काय?' नेटकऱ्यांनी टोचलं...

मुंबई - बॉलीवू़डमधील किंग खान (Shah Rukh Khan) म्हणून शाहरुखची ओळख आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ त्यानं बॉलीवूडमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटविला आहे. सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असणारा शाहरुख वेगवेगळ्या माध्यमातून चाहत्यांच्या चर्चेत असतो. गणरायाचा उत्सव बॉलीवूडमध्येही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यावेळी अनेक सेलिब्रेटींक़डे गणरायाचे आगमन होते. आता त्यात काही वेगळ्या धर्माचे सेलिब्रेटीही आहेत. मात्र ते श्रद्धापूर्वक, मनोभावे गणरायाची आराधना करतात. काहींना ही गोष्ट खटकते. विशेषत शाहरुखनं त्याच्या गणरायाच्या विसर्जनाचे फोटो सोशल मीड़ियावर शेयर केले. त्यावरुन त्याला मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं आहे. त्याला अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटही केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी शाहरुखनं आपल्या गणरायाचा एक फोटो व्हायरल केला. त्यावर त्याला चाहत्यांनी लाईक्स, कमेंट केल्या मात्र ट्रोलर्सनं त्याला फटकारलं. तुला तुझ्या धर्माचा विसर पडला की काय, या शब्दांत त्यांनी राग व्यक्त केला आहे. अर्थात यावर किंग खाननं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ज्यावेळी त्यानं गणरायाची पूजा केली त्यावरुन त्याला टार्गेट करण्यात आले आहे. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारुन ट्रोलर्सनं भंडावून सोडलं आहे. त्याला त्याच्या धर्मावरुन काही प्रश्नही विचारण्यात आले आहेत. शाहरुख त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेयर करताना दिसतो. त्याचा सोशल मीडियावर असणारा चाहतावर्गही लाखोंच्या घरात आहे.

शाहरुखनं आपल्या इंस्टावरुन गणपती विसर्जनाचा फोटो शेयर केला आहे. त्यावर त्यानं आपल्या चाहत्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. त्यानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, गणरायाची आपल्यावर नेहमीच कृपा असावी. पुढील वर्षांपर्यत त्याची कृपा आपल्यापर्यत राहावी. असं साकडं त्यानं बाप्पाला घातलं आहे. गणपती बाप्पा मोरया....अशा शब्दांत त्यानं आपली भावना व्यक्त केली होती. यावरुन एका ट्रोलर्सनं त्याला त्याच्या धर्माची आठवण करुन दिली आहे. त्यानं लिहिलं आहे की, तु तुझा धर्म विसरला की काय, यापूर्वीच तु तुझा धर्म बदललेला आहेस. काही लोकांना खुश करण्यासाठी तु अनेक मर्यादा ओलांडल्या आहेस. तु एक विसरतो आहेस की, तु मुस्लिम आहेस. अशा शब्दांत त्या ट्रोलर्सनं शाहखचे कान टोचले आहेत.

हेही वाचा: 'शाहरुख नव्हे मी बॉलिवूडचा किंग'; ऋतिक कूल डॅडीच्या भूमिकेत

loading image
go to top