esakal | अखेर ट्विटरचा माफीनामा; चूक सुधारण्यासाठी मागितला वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

 Meenakshi Lekhi, Chairperson, Joint Committee of Parliament on Data Protection Bill

मिनाक्षी लेखी यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, ट्विटरने या प्रकरणात चूक झाल्याची कबुली दिली असून यात सुधारणा करण्यासाठी वेळ मागितला आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत ही सुधारणा अपेक्षित आहे, असे मिनाक्षी लेखी यांनी म्हटले आहे.  भारताचा भूभाग हा चीनच्या हद्दीत दाखवल्याप्रकरणी ट्विटर आयएनसीचे मुख्य गोपनीयता अधिकारी डेमियन करेन यांनी एका प्रतिज्ञापत्राद्वारे माफी मागितली आहे. 

अखेर ट्विटरचा माफीनामा; चूक सुधारण्यासाठी मागितला वेळ

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

सोशल मीडियातील लोकप्रिय कंपनी असलेल्या ट्विटरने भारताच्या हद्दीत असलेल्या लडाखचा भूभाग चीनमध्ये दाखवणाऱ्या नकाशाबद्दल माफी मागितली आहे. ही चूक सुधारण्यासाठी ट्विटरने 30 नोव्हेंबरपर्यंत अवधी मागितला आहे. ट्विटरने एका नकाशामध्ये लडाखचा भूभाग चीनच्या हद्दीत दाखवला होता.

या मुद्यावरुन भारताने आक्षेप नोंदवला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी भारताकडून संसदीय समितीची निवड करण्यात आली होती. या समितीच्या अध्यक्ष मिनाक्षी लेखी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. 

मिनाक्षी लेखी यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, ट्विटरने या प्रकरणात चूक झाल्याची कबुली दिली असून यात सुधारणा करण्यासाठी वेळ मागितला आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत ही सुधारणा अपेक्षित आहे, असे मिनाक्षी लेखी यांनी म्हटले आहे.  भारताचा भूभाग हा चीनच्या हद्दीत दाखवल्याप्रकरणी ट्विटर आयएनसीचे मुख्य गोपनीयता अधिकारी डेमियन करेन यांनी एका प्रतिज्ञापत्राद्वारे माफी मागितली आहे. 

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना झोंबले महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

मागील महिन्यात डेटा सुरक्षा विधेयकावरील चर्चेवेळी संसदेच्या संयुक्त समितीने लडाखला चीनचा भाग दाखवणाऱ्या ट्विटरच्या नकाशावर आक्षेप घेत टीका केली होती. हा प्रकार देशद्रोहाच्या प्रकारात मोडतो, अशी भूमिका समितीने मांडली होती. संबंधित प्रकरणात ट्विटरने माफी मागावी, असेही समितीने म्हटले होते. एवढेच नाही तर ट्विटरच्या मार्केटिंग टीमकडून नव्हे तर ट्विटर इंकच्यावतीने चूक कबूल करुन माफिनाम्यासह चूक सुधारावी, अशी मागणी समितीने केली होती.  

loading image