करा आता आपल्या आवाजातील ट्‌विट

करा आता आपल्या आवाजातील ट्‌विट

बॅंकॉक -  सोशल मीडियावरील एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म असलेल्या ट्‌विटरवर आता आपल्या आवाजातील ट्‌विट करणे शक्‍य होणार आहे. ट्‌विटरने त्यासाठी ‘व्हॉइस ट्‌विट’ची सुविधा उपलब्ध करून दिल्याने मजकूर टाइप करण्यापासून आता युजरची सुटका झाली आहे. पहिल्या टप्प्यात काही ठरावीक युजरना याचा लाभ घेता येणार असून, हळूहळू सर्वांसाठी हे फीचर वापरता येईल, अशी माहिती ट्विटरने दिली आहे. 

‘ट्विटर’ने म्हटले आहे, की यापूर्वी ट्विटरवर अशा प्रकारे सुविधा नव्हती. युजरला आपले ट्विट टाइप करावे लागत होते. त्यासाठी २८० अक्षरांची मर्यादा होती. त्यामुळे अनेकांना आपल्या भावना व्यक्त करताना अडचणी येत होत्या. त्याचा काही प्रमाणात फटकाही ट्विटरला बसला आहे. त्यामुळे युजरच्या मानवी भावना जपण्यासाठी हे ‘व्हॉइस ट्‌विट’चे फिचर देण्यात आले आहे. ‘व्हाॅइस ट्विट’ करण्याची पद्धत जुन्या ट्विट टाइप करायचो त्याप्रमाणे ठेवण्यात आली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

ही आहेत व्हाॅइस ट्‌विटची वैशिष्ट्ये
१४० सेकंदामध्ये व्हॉइस ट्‌विट करता येईल
त्यापेक्षा अधिक वेळ लागल्यास लगेच दुसरे ट्‌विट सुरू होईल
पहिल्याप्रमाणेच आपले हे व्हॉइट ट्‌विट आपल्या प्रोफाइलवर दिसेल
दुसऱ्या ट्‌विटसाठी स्क्रोल केल्यानंतरही पहिले ट्‌विट ऐकता येईल
ही सुविधा पहिल्या टप्प्यात आयओएस मोबाईलसाठी आहे

भारत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com