...म्हणून दोघा भावांच्या प्रायव्हेट पार्टवर टाकले पेट्रोल

two brother stripped thrashed on suspicion of theft at rajasthan
two brother stripped thrashed on suspicion of theft at rajasthan

जयपूर (राजस्थान): दोघा भावांच्या प्रायव्हेट पार्टवर पेट्रोल टाकून दोघांना बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल पंपावर चोरी केल्याच्या संशयावरून दोन भावांना कर्मचाऱयांनी बेदम मारहाण केली. हात, पाय व दोरीने मारहाण करण्यात येत होती. मारहाण करताना त्यांच्या प्रायव्हेट पार्टवर पेट्रोल टाकण्यात आले. संबंधित घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून, व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून, पुढील चौकशी सुरू आहे.

पोलिस अधिकारी राजपाल सिंह यांनी सांगितले की, नागौर शहरामधील पट्रोल पंपावरील कर्मचाऱयांनी दोघांना बेदम मारहाण केली. दोघांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com