घरी चहा प्यायला गेला अन् दोन चिमुकल्यांना संपवलं, आरोपीचा पोलीस एनकाऊन्टरमध्ये मृत्यू; परिसरात तणाव

Uttar Pradesh Badaun Crime: बाबा कॉलोनीमध्ये दोन लहान मुलांची हत्या करण्यात आलीये, तर एक चिमुकला गंभीर जखमी झाला आहे.
 Two children were killed
Two children were killed

लखनऊ- यूपीच्या बदायूंमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील बाबा कॉलोनीमध्ये दोन लहान मुलांची हत्या करण्यात आलीये, तर एक चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. आरोपीने मुलांची हत्या करुन तेथून पळ काढला. पोलिसांना याची माहिती देण्यात आली तेव्हा त्यांनी आरोपीचा पाठलाग केला. यात आरोपीचा एनकाऊन्टर झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Two children were killed by their neighbour in Uttar Pradesh Badaun)

सदर घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. काही गाड्यांची संतप्त जमावाने तोडफोड केल्याची माहिती आहे. पोलिसांनी शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे. बदायुंचे डीएम मनोज कुमार यांनी यासंदर्भातील अधिक माहिती दिली. ते म्हणाले की, घटनेची माहिती मंडी समिती पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली होती. एका व्यक्तीने घरात घुसून ११ आणि ६ वर्षांच्या दोन मुलांची हत्या केली आहे, तर एकाला गंभीर जखमी केलं आहे. (accused killed in a police encounter)

 Two children were killed
Mumbai Crime: मुंबईत वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवण्याऱ्या पोलिसांनी ठोकल्या बेड्या; दोघांचा शोध सुरु

हत्येचं कारण अस्पष्ट

दोन्ही मुलांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. गंभीर जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. फरार आरोपीचा पोलिसांना पाठलाग केला. त्यावेळी आरोपीने पोलिसांवर गोळीबार सुरु केला. पोलिसांनी गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं. यात आरोपीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

बरेलीचे आयजी राकेश कुमार यांनी यासंदर्भात सांगितलं की, घटनेची माहिती मिळल्यानंतर पोलिसांची एक टीम घटनास्थळी पोहोचली होती. आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याने गोळीबार सुरु केला. कारवाईमध्ये आरोपीचा मृत्यू झालाय. आरोपी २५ ते ३० वर्षे वयाचा आहे.

 Two children were killed
Nagpur Crime: ६ वर्षीय चिमुकलीवर ६१ वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार, कोर्टाने सुनावली २० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

मंगळवारी रात्री आठ वाजता साजिद नावाचा एक व्यक्ती आपल्या दुकानासमोर असलेल्या विनोद सिंह यांच्या घरी गेला. त्यांच्या पत्नीला चहा करण्यास सांगितलं. अचानक त्याने तीन मुलांची कुऱ्हाडीने हत्या केली. आरोपीने हे पाऊल का उचललं हे कळू शकलेलं नाही. पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी बुधवारी सकाळी पीडितांच्या घरी जाऊन पाहणी केली आहे,

घरी गेला, चहा मागितला अन्...

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद कुमार सिंह बाबा कॉलोनीत राहतात. त्यांची पत्नी घरीच पार्लर चालवते. घरी त्या आपल्या तीन मुलांसोबत एकट्या होत्या. त्यावेळी साजिद त्यांच्या घरी आला. साजिद हा विनोद कुमार सिंह यांच्या घरासमोर सलुनचे दुकान चालवतो. ओळख असल्याने विनोद कुमार सिंह यांच्या पत्नीने साजिदला घरी येऊ दिलं. साजिदने त्यांना चहा करण्यास सांगितलं. जेव्हा त्या चहा करण्यासाठी गेल्या त्यावेळी साजिद मुलं खेळत होते त्याठिकाणी गेला अन् मुलांवर कुऱ्हाडीने वार केले. त्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com