esakal | Video : रशियाची भारताला मदत; पाठवली २२ टन वैद्यकीय उपकरणे

बोलून बातमी शोधा

Russia Aircraft

Video : रशियाची भारताला मदत; पाठवली २२ टन वैद्यकीय उपकरणे

sakal_logo
By
एएनआय वृत्तसंस्था

Fight with Corona : नवी दिल्ली : भारतात दिवसेंदिवस कोरोना संक्रमण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रशियाकडून वैद्यकीय उपकरणांची मदत पाठवण्यात आली आहे. रशियाने भारताला पाठवलेल्या उपकरणांमध्ये २० ऑक्सिजन कंसंट्रेटर, ७५ व्हेंटिलेटर, १५० बेडसााईड मॉनिटर आणि औषधांचा समावेश आहे. हे साहित्य घेऊन दोन विमाने भारतात पहाटेच्या सुमारास दाखल झाली. यासंदर्भात केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने म्हटले आहे की, एअर कार्गो आणि दिल्ली कस्टम्स विभाग दोन्ही विमानातील साहित्यांचे व्यवस्थापन करत आहेत.

हेही वाचा: देशात 150 जिल्ह्यात लॉकडाऊनची शक्यता

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी घेतलेल्या आढावा बैठकीत महसूल विभागाला वैद्यकीय उपकरणांबाबत तत्काळ मंजूरी देण्याचे निर्देश दिले. यानंतर महसूल विभागाने सीमाशुल्क विभागाशी संबंधित मुद्यांबाबत सीमा शुल्क संयुक्त सचिव गौरव मसलदन यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिका, रशिया, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, बेल्जियम, रोमानिया, लक्झेंबर्ग, सिंगापूर, पोर्तुगाल, स्वीडन, न्यूझीलंड, कुवैत आणि मॉरिशस या देशांनी कोरोना महामारीच्या काळात भारताला वैद्यकीय मदत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

हेही वाचा: Good News : सीरमची लस आणखी स्वस्त

पुतीन आणि मोदी यांच्यात चर्चा

पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात बुधवारी (ता.२८) फोनद्वारे चर्चा झाली. यावेळी मोदींनी कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत पुतीन यांना माहिती दिली. आणि रशियाने मदतीचा हात दिल्याबद्दल पुतीन यांचे आभारही मानले.

हेही वाचा: पश्चिम बंगालमध्ये आज अखेरच्या आठव्या टप्प्याचे मतदान

भारताला कोणकोणत्या देशांनी मदत केली?

सिंगापूरने मंगळवारी भारताला २५६ ऑक्सिजन सिलिंडर्स पुरवले आहेत. नॉर्वे सरकारने वैद्यकीय सेवांसाठी २४ लाख अमेरिकी डॉलरची मदत जाहीर केली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी ऑक्सिजन कंसंट्रेटर, व्हेंटिलेटर आणि इतर वैद्यकीय उपकरणे भारताला पाठवणार असल्याचे स्वित्झर्लंडने जाहीर केलंय. तसेच इतर देशांनीही व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कंसंट्रेटर आणि इतर सामग्री पाठविण्याची घोषणा केली आहे.