कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये झालेले 7 महत्त्वाचे बदल

jammu kashmir
jammu kashmir
Summary

जम्मू-काश्मीरला (Jammu and Kashmir) विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवून आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत.

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरला (Jammu and Kashmir) विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवून आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. आजच्याच दिवशी २०१९ मध्ये काश्मिरचा विशेष दर्जा काढून टाकण्यात आला होता. केंद्रातील मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला दोन केंद्रशासित प्रदेशात (जम्मू-काश्मीर आणि लडाख) विभागले. गुरुवारी या ऐतिहासिक निर्णयाला दोन वर्ष पूर्ण झाली. या दोन वर्षात जम्मू-काश्मीरसंबंधी अनेक बदल करण्यात आले आहेत. यातील काही महत्त्वाचे बदल आपण पाहूया... (National Latest Marathi News)

१. स्थानिक निवासीचा दर्जा

जम्मू-काश्मिरचा रहिवाशी बनण्याच्या नियमांमध्ये बदल करत इतर राज्यातील पुरुषांना याठिकाणी स्थायिक होण्याचा नियम करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरच्या महिलेशी लग्न करणाऱ्या इतर राज्यातील पुरुषाला स्थानिक रहिवाशी होता येणार आहे. याआधीपर्यंत महिलेचा पती आणि मुलांना जम्मू-काश्मीरचा रहिवाशी मानलं जात नव्हतं.

२. जमीन खरेदी करणे शक्य

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर बाहेरील लोकांना बिगर-कृषी योग्य जमीन खरेदी करण्याची मंजुरी दिली आहे. याआधी जम्मू-काश्मीरच्या लोकांनाच जमीन खरेदी करण्याची परवानगी होती.

jammu kashmir
कोवॅक्सिनला आणखी एका देशात वापरास परवानगी

३. सरकारी इमारतींवर तिरंगा

२०१९ मध्ये कलम-३७० हटवल्यानंतर २० दिवसांनी श्रीनगरच्या सचिवालयातून जम्मू-काश्मीरचा झेंडा काढून तेथे तिरंगा फडकवण्यात आला. सर्व सरकारी कार्यालय आणि संवैधानिक संस्थावर राष्ट्रीय ध्वज फडकवला जाऊ लागला.

४. दगडफेक करणाऱ्यांना पासपोर्ट नाही

नुकतेच केंद्र शासित प्रदेश सरकारने आदेश जारी केलाय की, दगडफेक आणि राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सहभागी लोकांना पासपोर्ट दिला जाणार नाही. तसेच सरकारी नोकऱ्यांपासून त्यांना वंचित ठेवलं जाईल.

५. सत्तेचे विकेंद्रिकरण

जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढण्यात आल्यानंतर केंद्र सरकारने त्या ठिकाणी विकेंद्रीकरणाचा प्रयत्न केला आहे. त्याअंतर्गत तेथे पहिल्यांच पंचायत आणि नंतर बीडीसी निवडणुका घेण्यात आल्या.

jammu kashmir
मोदी सरकारसाठी 5 ऑगस्ट खास, आज होणार ऐतिहासिक घोषणा?

६. गुपकार गठबंधनचा उदय

जम्मू-काश्मीरमधील पक्षांनी एकत्र येत गुपकार गठबंधन केले आहे. यात पीडीपी आणि नॅशनल कॉन्फ्रेंससह इतर महत्त्वाच्या पक्षांचा समावेश आहे. त्यांनी एकत्र निवडणुका लढवल्या होत्या.

७. शेख अब्दुल्लांचा जन्मदिवस साजरा करणे बंद

दरवर्षी ५ सप्टेंबरला शेख अब्दुल्ला यांचा जन्मदिवस सार्वजनिकरित्या साजरा केला जातो. पण, २०१९ पासून ही प्रथा बंद करण्यात आली आहे. तसेच शेख अब्दुल्ला यांचे नाव असलेल्या अनेक इमारतींचे नाव बदलण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com