१७ जूनलाच हत्येची घोषणा; कन्हैयाच्या मुलाने अनवधानाने पोस्ट केली शेअर

Riaz had announced Kanhaiyalals assassination on June 17
Riaz had announced Kanhaiyalals assassination on June 17Riaz had announced Kanhaiyalals assassination on June 17

उदयपूर : कन्हैयालालने पैगंबर मोहम्मद यांच्याविरोधात टिप्पणी करणाऱ्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा (Nupur Sharme) यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर काहीतरी पोस्ट केले होते. तेव्हापासून या वादाला सुरुवात झाली होती. कन्हैयाच्या आठ वर्षांच्या मुलाने ही वादग्रस्त पोस्ट चुकून काही व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवली असल्याचेही कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तेव्हापासून कन्हैयालाल कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर आला होता. (Riaz had announced Kanhaiyalals assassination on June 17)

१७ जून रोजी रियाझने कन्हैयाला ठार मारण्याची धमकी देणारा व्हिडिओ जारी केला होता. यानंतर कन्हैयाने पोलिसांत तक्रारही केली. त्याचवेळी काही लोकांचा असाही दावा आहे की, मुस्लिम (Muslim) समाजातील काही लोकांनी कन्हैयावर गुन्हाही दाखल केला होता. मात्र, तो जामिनावर सुटला होता.

Riaz had announced Kanhaiyalals assassination on June 17
...याचा अर्थ काय? एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न

नूपुर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याप्रकरणी धनमंडी पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात कन्हैयालालचाही समावेश होता. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तिघांनाही अटक केली होती. नंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. हे तिघेही कट्टरपंथीयांच्या निशाण्यावर होते आणि कन्हैयालाल त्याचा बळी (Murder) ठरल्याचे सांगण्यात येत आहे.

१७ जून केली होती हत्येची घोषणा

राजस्थानमधील उदयपूरमध्ये नूपुर शर्माला (Nupur Sharme) पाठिंबा दिल्यामुळे कन्हैयालाल नावाच्या शिंपीची दिवसाढवळ्या हत्या (Murder) करण्यात आली. घटनेच्या काही तासांनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे १७ जून रोजीच आरोपींनी कन्हैयालालची हत्या करणार असल्याची घोषणा केली होती. याचा व्हिडिओही त्यांनी जारी केला होता. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशा परिस्थितीत राजस्थान पोलिसांना चपराक बसले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com