esakal | उद्धव ठाकरेंचे मन मोठे नाही - नारायण राणे
sakal

बोलून बातमी शोधा

Narayan Rane

उद्धव ठाकरेंचे मन मोठे नाही - नारायण राणे

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - ‘कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister) झाल्यानंतर मला शरद पवार (Sharad Pawar) यांनी फोन (Phone) केला आणि ‘चांगले काम करा‘, असे सांगितले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मन एवढे मोठे नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मला मंत्रिपद मिळाल्यानंतर फोन केला नाही,’ अशा शब्दांत केंद्रीय सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना टोला लगावला. (Uddhav Thackeray Narayan Rane Politics)

भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने नारायण राणे यांना कॅबिनेट मंत्रिपद देऊन शिवसेनेला इशारा दिल्याचे स्पष्ट आहे. त्याचबरोबर नजीकच्या काळात दोन्ही पक्ष एकत्र येतील, अशी कल्पना रंगविणाऱ्यांनाही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राणे यांच्या निवडीने उत्तर दिल्याचे मानले जाते. राणे यांनी मंत्री म्हणून बोलताना ठाकरे यांच्याबरोबरचा वाद आपण विसरणार नसल्याची स्पष्ट कल्पना दिली. त्यामुळे कोकणातच नव्हे, तर मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीतही राणे पितापुत्र शिवसेनेविरोधात सक्रिय राहणार हे स्पष्ट झाले आहे. केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळालेल्या डॉ. भारती पवार आज सकाळी पदभार स्वीकारल्यावर लगेच नवे आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोविड व्यवस्थापन बैठकीत सहभागी झाल्या. आदिवासी भागात ‘एम्स’ आणण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: 'खूब भालो'... दादा-दीदींची ग्रेट भेट!

...तर लोकल सुरु करू

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रिपदी बदली झालेले रावसाहेब दानवे यांनी, मुंबईतील लोकल सेवा पुन्हा सुरू करण्याचा मुद्दा राज्य सरकारच्याच अखत्यारीत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, राज्य सरकारने विनंती केली तर लोकल सुरू करण्याबाबत केंद्र लगेच निर्णय करेल.

शिवसेनेला उत्तर

नारायण राणे यांना कमी महत्त्वाचे मंत्रिपद मिळाले, असे सांगणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना राणे म्हणाले की, ‘कोणतेही खाते छोटे किंवा मोठे नसते. मी या खात्याचा कार्यभार पाहीन आणि या खात्याला न्याय देईन, तेव्हा कळेल की हे खाते किती महत्वाचे असते.’ आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनीही राज्य सरकारला टोला लगावताना, लस पुरवठ्यावरून राजकारण करू नये, असे सांगितले. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दावा करतात की राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले. असे असेल तर लशी कमी मिळतात असे ते कसे म्हणू शकतात?’, असा सवालही त्यांनी विचारला.

loading image