
नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील आपल्या शासकीय निवासस्थानी ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांसाठी शुक्रवारी स्नेहभोजन आयोजित केले होते. यावेळी, त्यांनी निवडणूक आयोगावरील आरोपांबाबत सर्वांसमोर पुन्हा सादरीकरण केले. यावेळी उद्धव ठाकरे मागील रांगेत बसले होते. त्यावरून भाजप, शिवसेनेने हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचा दावा करत डिवचले.