

End of an Era in Kerala: UDF Triumphs as LDF Rule Collapses
sakal
केरळम विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीने (यूडीएफ) १४० पैकी ९७ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे. गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या मार्क्सवादी काँग्रेसप्रणित डाव्या लोकशाही आघाडीचा (एलडीएफ) या निवडणुकीत दारुण पराभव झाला. या निकालाने अनेक मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाजही फोल ठरले आहेत. पिनराई विजयान यांच्या नेतृत्वशैलीला ‘पिनराईवाद’ असे संबोधले जात होते. आता ‘एलडीएफ’च्या पराभवाने हा ‘पिनराईवाद’चा अस्त झाला आहे.