esakal | अंतिम वर्षांच्या परिक्षेबाबत यूजीसी आग्रही; आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
sakal

बोलून बातमी शोधा

अंतिम वर्षांच्या परिक्षेबाबत यूजीसी आग्रही; आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

अंतिम वर्षाची परिक्षा कोरोनामुळे देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची परिक्षा घेण्याची सूचना यूजीसीने केली आहे. त्यावेळी ही परिक्षा देणाऱ्यांची पुढील शिक्षणाच्या प्रवेशांची तसेच नोकरीची संधी हुकली असेल, असे उत्तर याचिकाकर्त्यांनी दिले आहे.

अंतिम वर्षांच्या परिक्षेबाबत यूजीसी आग्रही; आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

sakal_logo
By
संजय घारपुरे

नवी दिल्ली : देशभरातील 31 विद्यार्थ्यानी अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. त्याबद्दल आज (ता. 31) सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करताना परिक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले. त्यावर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी याचिका सादर केलेल्या 31 पैकी एक विद्यार्थ्यास कोरोनाची लागण झाली असल्याचेही लक्षात घेतले नसल्याकडे लक्ष वेधले.

आयटीआयची प्रवेश प्रवेशप्रक्रिया 1 ऑगस्टपासून; यंदा तब्बल 'इतक्या' जागा उपलब्ध.... 

अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याच्या निर्णयावर आपण ठाम आहोत, असे प्रतिज्ञापत्र विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केले. मात्र, कोरोनामुळे बिघडत असलेल्या प्रतिकुल परिस्थितीत विद्यार्थ्यांची कोणतीही काळजी घेण्यास विद्यापीठ अनुदान आयोग तयार नसल्याचे प्रतिपादन याचिकाकर्त्यांनी आपल्या मूळ याचिकेस जोड देताना केले.  

लॉकडाऊनमधून नव्हे, तर 'यामध्ये' सूट द्या; पुरुषांनी केली न्यायालयाकडे मागणी...

अंतिम वर्षाची परिक्षा कोरोनामुळे देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची परिक्षा घेण्याची सूचना यूजीसीने केली आहे. त्यावेळी ही परिक्षा देणाऱ्यांची पुढील शिक्षणाच्या प्रवेशांची तसेच नोकरीची संधी हुकली असेल, असे उत्तर याचिकाकर्त्यांनी दिले आहे. आयोगाने परिक्षा घेण्यास पुरेसा वेळ दिला होता तसेच त्यासाठी ऑनलाईनचाही पर्याय दिला आहे याकडे लक्ष वेधले आहे. मात्र याचिकाकर्त्यांनी कोरोना असताना परिक्षा घेणे धोकादायक असेल असे सांगितले. त्याचबरोबर सप्टेंबरपर्यंत कोरोनाची साथ आटोक्यात येण्याचे कोणतेही चिन्हे नाही, या आयसीएमआरच्या अहवालाकडे लक्ष वेधले आहे. 

मुंबईकर महिलांची प्रतिकार शक्ती पुरुषांपेक्षा जास्त, सिरो सर्व्हेचा निष्कर्ष...

आयोगाने नवी भूमिका मांडताना आसाम, बिहार, इशान्य राज्यातील पूराचा एकंदर शंभर जिल्ह्यांना फटका बसला आहे हे विचारात घेतलेच नाही. तसेच आयोगाने सर्व प्रश्न लक्षात घेऊनच सुचवले असल्याचे म्हटले आहे, पण जम्मू काश्मीर, लडाखमध्ये तसेच ग्रामीम भारतात इंटरनेट यंत्रणा योग्य नाही हे लक्षात घेतले नाही असे याचिकाकर्त्यांनी उत्तर दिले आहे. 

अखेर डबल डेकर बस धावली रस्त्यावर, 'या' मार्गावर असेल सेवा

अंतिम वर्षाच्या परिक्षा न घेण्याचा महाराष्ट्र, दिल्लीचा निर्णय हा आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा भंग करणारा आहे, असे आयोगाने म्हटले आहे. त्यावर कोरोना कालावधीत परिक्षेची सक्ती करणे हा घटनेने दिलेल्या आधिकाराचा भंग होतो असा दावा याचिकाकर्त्यांतर्फे करण्यात आला आहे.  त्याचबरोबर विद्यार्थ्यांना यापूर्वीच्या निकालाच्या आधारे गुणपत्रिका न दिल्यास त्यांची नोकरीची तसेच पुढील शिक्षणाची संधी हुकण्याची शक्यता आहे असेही याचिकेत म्हंटले आहे.
---
संपादन : ऋषिराज तायडे