

UGC New Rule Controversy Sparks Nationwide Academic Unrest
Esakal
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नव्या नियमावलीमुळे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. देशातील कॉलेज, विद्यापीठांना मान्यता देणाऱ्या युजीसीकडे कॉलेजचे अधिकार काढून घेण्याचेही अधिकार आहेत. शिक्षणाचा दर्जा, शिक्षकांची योग्यता, सरकारकडून निधी देणं इत्यादी अधिकार युजीसीकडे असतात. अलिकडेच युजीसीने प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन रेग्युलेशन्स २०२६ नावाने एक नियमावली जारी केलीय. यात कॉलेज आणि विद्यापीठांमधील भेदभाव कमी कऱण्याचा उद्देश असल्याचं युजीसीने म्हटलंय. पण याच नियमावलीला खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी, प्राध्यापकांनी विरोध केला आहे.