Ujjain Mahakal Temple Fire: उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात भस्म आरतीदरम्यान लागली आग, पुजाऱ्यासह १३ जण जखमी

Ujjain Mahakal Temple Fire: मध्य प्रदेशातील उज्जैन येथे असलेल्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात भस्म आरतीदरम्यान आज आग लागली, ती विझवण्यात आली. या अपघातात पुजाऱ्यासह १३ जण जखमी झाले आहेत.
Fire breaks out at Mahakal temple in Ujjain
Fire breaks out at Mahakal temple in UjjainEsakal

Ujjain Mahakal Temple Fire: मध्य प्रदेशातील उज्जैन येथे असलेल्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात आज भस्म आरतीदरम्यान आग लागली. या आगीच्या घटनेच पुजाऱ्यासह १३ जण जखमी झाले आहेत. आरतीच्या वेळी गुलाल उधळल्यामुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आग वेळीच आटोक्यात आणण्यात आली. यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, या घटनेदरम्यान गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती देताना उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंह म्हणाले की, आग आटोक्यात आणण्यात आली आहे. या घटनेत लोक किरकोळ भाजले. कोणीही गंभीर जखमी नाही.

गर्भगृहाच्या भिंती आणि छतावर चांदीचा लेप आहे. होळीला बाबा महाकालला गुलाल अर्पण करतात आणि पुजारीही एकमेकांना रंग लावतात. हे रंग गर्भगृहाच्या भिंतींना खराब होऊ नयेत यासाठी यंदा शिवलिंगावर प्लास्टिकचे फ्लेक्स लावण्यात आले असून गर्भगृहात एकमेकांवर रंगांचा वर्षाव होत असताना आरतीच्या ताटात जळणाऱ्या कापूरवर गुलाल उधळला गेला, त्यामुळे कापूर आगीने पेट घेतला मात्र, काही वेळातच आग आटोक्यात आली.

Fire breaks out at Mahakal temple in Ujjain
Arvind Kejriwal ED Case : केजरीवलांनी कोठडीतून दिलेला 'तो' आदेश अडचणीत; EDकडून चौकशीला सुरूवात

रविवारी सायंकाळपासूनच महाकालेश्वराच्या प्रांगणात होळी उत्सवाला सुरुवात झाली होती. येथे सर्वप्रथम सायंकाळच्या आरतीवेळी हजारो भाविकांनी बाबा महाकाल यांच्यासोबत गुलालाची होळी खेळली. त्यानंतर महाकाल प्रांगणात होलिका दहन करण्यात आले.

फुलांनी होळीची झाली सुरुवात

जगप्रसिद्ध महाकालेश्वरच्या प्रांगणात रविवारी सायंकाळी होळी उत्सवाला सुरुवात झाली होती.संध्याकाळच्या आरतीमध्ये हजारो भाविकांनी बाबा महाकालच्या सोबत गुलालाची उधळण करून होळी खेळली. त्यानंतर महाकालच्या प्रांगणात होलिका दहन करण्यात आले. रविवारी भस्म आरतीमध्ये 51 क्विंटल फुलांची होळी करून भाविकांनी उत्सवाला सुरुवात केली.

Fire breaks out at Mahakal temple in Ujjain
Bhojshala Latest News: भोजशाळा मशीद आधी होतं सरस्वती मंदिर, माजी ASI अधिकाऱ्याचा मोठा दावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com