युक्रेनमधील भारतीय डॉक्टरचा मोठा निर्णय, होतंय कौतुक

Ukraine Russia War
Ukraine Russia Ware sakal

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Ukraine Russia War) अजूनही सुरूच आहे. युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी मायदेशी परतत आहेत. पण, एका ३७ वर्षीय भारतीय डॉक्टरने युद्धग्रस्त युक्रेन न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढल्यानंतरच मी बाहेर पडणार, असा निर्णय त्यांनी घेतला आहे.

Ukraine Russia War
Russia-Ukraine War : पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

डॉ. पृथ्वी राज घोष असे भारतीय डॉक्टरचे नाव आहे. ते सांगतात, ''मी किव्हमध्ये अडकलो नाही. मी इथे जाणीवपूर्वक थांबलो आहे. आतापर्यंत माझ्या संपर्कात असलेल्या ३५० विद्यार्थ्यांना मी किव्हमधून बाहेर काढले. माझ्या काही समन्वयकांनी आधीच देश सोडला आहे. त्यांनी देखील त्यांच्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यास मला सांगितले आहे.'' रशियानं दोन शहरांत युद्ध तात्पुरतं थांबण्याचा निर्णय येथील सामान्य नागरिकांसाठी घेतला आहे. फक्त भारतीय विद्यार्थ्यांसाठी युद्ध थांबवलं असं नाही. खारकिव्हमध्ये अजूनही २ हजार भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत, असंही घोष यांनी सांगितले.

माझ्या पालकांना माझी काळजी आहे. मी त्यांच्या भावना समजू शकतो. पण, विद्यार्थ्यांना युक्रेनमधून सुखरूप बाहेर काढणे ही माझी जबाबदारी आहे. मी पालकांना वचन दिले की त्यांच्या मुलांची मी काळजी घेईन. त्यामुळे मी सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढल्याशिवाय युक्रेनमधून निघणार नाही, असं घोष म्हणाले.

पृथ्वी यांच्या पालकांना अभिमान -

घोष यांचे आई-वडिल भारतात आहेत. आपला मुलगा युक्रेनमध्ये असल्यानं ते घाबरले आहेत. पण, तो विद्यार्थ्यांना बाहेर काढत असल्याचा अभिमान देखील त्यांना वाटतोय. माझा मुलगा आणि इतर विद्यार्थी सुरक्षित परत येण्यासाठी दररोज प्रार्थना करत असल्याचं पृथ्वी यांची आई ब्रतती यांनी इंडिया टुडेसोबत बोलताना सांगितले. माझ्या मुलगा मला खूप अभिमान असून हे सर्व विद्यार्थी डॉ. पृथ्वीला मोठा भाऊ मानतात, असं त्यांचे वडील प्रदीप घोष म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com