Union Budget 2021: ' केंद्र सरकारने देश विकायला काढलाय'; अधिररंजन यांची टीका

टीम ई-सकाळ
Monday, 1 February 2021

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा तिसरा अर्थसंकल्प असून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीच तिसऱ्यांदा तो सादर केला आहे. 

Budget 2021: नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज बजेट सादर केलं. देशाचे हे पहिले पेपरलेस बजेट ठरले. त्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधिररंजन चौधरी यांनी केंद्र सरकारवर तिखट शब्दांत टीका केली आहे. 'अभूतपूर्व काळाला साजेसा असा अभूतपूर्व अर्थसंकल्प सादर होईल, अशी अपेक्षा होती, पण हा एक सामान्य अर्थसंकल्प ठरला आहे. या अर्थसंकल्पातून सरकारने खासगीकरणाचा मार्ग अवलंबून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.

 हेही वाचा - Budget 2021 Updates: बजेट सफळ संपूर्णम्; मोदी सरकारवर आणखी 80 हजार कोटींचा बोजा

चौधरी पुढे म्हणाले, 'काही राज्यात निवडणुका आहेत, त्यामुळे मतदारांना डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. त्यांनी पैसे खर्च केल्याचे सांगितले पण आम्हाला कोणतेही अनुदान मिळालेले नाही. तसेच गरिबांची मदत करण्यासाठी ते रोख पैशांची मदत करतील, अशी अपेक्षा होती, पण तीदेखील फोल ठरली. निर्गुंतवणूक आणि खासगीकरणाद्वारे सरकारने देश विकायला काढत आहे.'

UNION BUDGET 2021 Agriculture:  बजेटमधून शेती क्षेत्राला काय हवयं ?

दरम्यान, बजेट सादरीकरणावेळी शेअर मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली. डिजिटल इंडियाचा संदेशही बजेट सादरीकरणावेळी देण्यात आला. आर्थिक वर्ष २०२१-२२ या वर्षाच्या बजेटचा 'आर्थिक वॅक्सिन' असा उल्लेख केला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सादर करण्यात आलेल्या बजेटकडे सर्व देशाचं लक्ष लागलं होतं. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा तिसरा अर्थसंकल्प असून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीच तिसऱ्यांदा तो सादर केला आहे. 

Union Budget 2021 : 'मोदी सरकार सुटकेसवालं नाही'; मेड इन इंडिया टॅबवरून आलंय बजेट

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Budget 2021 Congress leader Adhir Ranjan Chowdhury criticized Nirmala Sitharaman

टॉपिकस