'मां-बेटे झूठे हैं, चोर हैं'.. लाइव डिबेटमध्ये संबित पात्रा-गौरव वल्लभ भिडले

Gaurav-and-Submit
Gaurav-and-Submit

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सोमवारी (दि.1) संसदेत देशाचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पाबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. अर्थसंकल्पावर एका वृत्त वाहिनीवरील संवादादरम्यान भाजप प्रवक्ते संबित पात्रा आणि काँग्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ यांच्यात जबरदस्त वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की हे दोघांनी एकमेकांवर वैयक्तिक चिखलफेक करण्यास सुरुवात केली. गौरव वल्लभ यांनी 2021 चा अर्थसंकल्प सर्वात वाईट असून तो शेतकरी विरोधी असल्याचा आरोप केला. यावर संबित पात्रा यांनी तुमच्या पक्षाच्या आई आणि मुलाने देशाला लुटले आहे, ते खोटारडे आहेत, चोर आहेत, ते जामिनावर बाहेर आहेत, अशा शब्दांत टीका केली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संबित पात्रा यांनी निर्मला सीतारामण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प जबरदस्त असल्याचे म्हटले. त्यांनी विशेषतः आरोग्यावरील तरतुदीचा उल्लेख केला आणि 1 लाख 72 हजार कोटींची तरतूद केल्याचे सांगितले. यावर संबित पात्रा यांनी 26 जानेवारीचा उल्लेख केला. आज दिल्ली पोलिस संरक्षणासाठी सज्ज आहे. उद्या काही झालं तर हेच अमरिंदर सिंग आणि काँग्रेसी दिल्ली पोलिसांची काय तयारी होती, असा सवाल करतील. 

यावर गौरव वल्लभ किसान सन्मान निधी का वाढवला नाही, एमएसपी का वाढवला नाही, असे प्रश्न उपस्थित केले. मनमोहन सरकारच्या काळात अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावर पात्रा यांनी आम्ही ऍबसॉल्यूट नंबर सांगणार नसल्याचे सांगत गौरव वल्लभ यासाठी मला भाग पाडू शकत नाहीत, असे म्हटले. 

सरकार म्हणतंय की आम्ही शेतकऱ्यांपासून केवळ एक कॉल दूर आहोत आणि दुसऱ्या बाजून काटे पसरवत आहेत, असा आरोप गौरव वल्लभ यांनी केला. यावर संबित पात्रा यांनी हे शेतकऱ्यांसाठी नव्हे तर समाजातील असामाजिक तत्त्वांसाठी असल्याचे सांगितले. शेतकरी तिरंग्याचा अपमान करणार नाही. ते हिंसा नाही करणार. माझा शेतकऱ्यांना सलाम आहे. लाल किल्ल्यावर तलवार दाखवली जाते. यावर आई आणि मुलगा काय म्हणणार ? 122 लोक हिंसेप्रकरणी अटक झाले आहेत. यावर काँग्रेसचे काय म्हणणे आहे? गौरव यांनी संबित यांना खोटारडे पात्रा म्हटलं. या व्यक्तीचा शेतकऱ्यांशी काहीही संबंध नाही. हे फिरवून फिरवून आकडे देणारे 'डॉक्टर्ड' पात्रा आहेत, असा टोला लगावला.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com