

Union Cabinet meeting decision
ESakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (१२ डिसेंबर २०२५) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन मोठे निर्णय घेण्यात आले. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, " २०२७ च्या जनगणनेबाबत निर्णय घेण्यात आला . यासाठी ११,७१८ कोटी रुपयांचे बजेट मंजूर करण्यात आले. दुसरे म्हणजे , कोळसा किंवा ऊर्जा क्षेत्रात मोठी सुधारणा लागू करण्यात आली आहे. तिसरे म्हणजे, शेतकऱ्यांबाबत निर्णय घेण्यात आला आहे."