

CIDCO House Rate Recalculation
ESakal
नवी मुंबई : नवी मुंबईतील सिडको घरांच्या किमतींवरून वाढत्या असंतोषाची अखेर सरकारी पातळीवर गांभीर्याने दखल घेतली जात आहे. परवडणाऱ्या घरांच्या नावाखाली जाहीर केलेल्या चढ्या किमतींमुळे सामान्य नागरिकांमध्ये वाढत्या असंतोषाला खतपाणी मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर, निष्पक्ष निर्णयाच्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे.