Dr_Harsh_Vardhan
Dr_Harsh_Vardhan

देशी बनावटीच्या कोरोना वॅक्सिनबाबत गुड न्यूज; केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले...

नवी दिल्ली : सर्व गोष्टी जुळून आल्या तर डिसेंबर अखेरपर्यंत भारत कोरोनाला आळा घालणारी वॅक्सीन तयार करण्यात यशस्वी होईल. देशात निर्मिती होणाऱ्या आणि ट्रायल सुरू असलेल्या दोन्ही कोरोना वॅक्सीन २०२० च्या शेवटपर्यंत उपलब्ध होईल, असा दावा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीवेळी त्यांनी ही माहिती दिली. भारत बायोटेकने तयार केलेली कोवॅक्सीन या वर्षअखेरपर्यंत उपलब्ध होईल. तसेच २०२१ च्या पहिल्या तिमाहीत वॅक्सीनचा वापर सुरू करण्यात येईल. 

देशात ३ वॅक्सीनवर सुरू आहे काम
आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील सर्वच देश त्यांनी तयार केलेल्या कोरोना वॅक्सीनची ट्रायल घेण्यामध्ये गुंतले आहेत. त्यामुळे स्वदेशी बनावटीच्या सर्व ट्रायल या वर्षाच्या शेवटपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या सर्व वॅक्सीन किती परिणामकारक आहेत, याबाबतची माहितीही मिळणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलेल्या वॅक्सीनचे उत्पादन सुरू केले आहे. कमीतकमी कालावधीत ही वॅक्सीन बाजारपेठेत आणण्याच्या दृष्टीने त्यांचे काम सुरू आहे. तसेच बाकी दोन्ही वॅक्सीनना बनविण्यात आणि बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करण्यास वेळ लागणार आहे. मात्र, या वर्षाअखेरपर्यंत या दोन्ही वॅक्सीनचे उत्पादन घेतले जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

तिन्ही वॅक्सीनबाबत थोडक्यात...
ऑक्सफर्ड वॅक्सीन - सीरम इन्स्टिट्यूटने म्हटले आहे की, भारतात मानवी चाचणी (Human Trial) सुरू करण्यात आले असून या वर्षाच्या शेवटी ही वॅक्सीन उपलब्ध करून देण्यात येईल. 
कोवॅक्सीन - हैदराबाद येथील भारत बायोटेकची निर्मिती असलेल्या या वॅक्सीनची मानवी चाचणी (Human Trial) दोन आठवड्यांपूर्वीच सुरू करण्यात आली आहे. ही वॅक्सीनही या वर्षाअखेरपर्यंत तयार होऊ शकते. 
जायकोव-डी - जायडस कॅडिलाने माणसांवरील क्लिनिकल ट्रायल सुरू केली आहे. येत्या काही महिन्यांमध्ये ट्रायल पूर्ण व्हायची शक्यता आहे. 

आरोग्य मंत्र्यांनी म्हटले आहे की, भारत हा जगातील सर्वात मोठा वॅक्सिनचे उत्पादन घेणारा देश आहे. वॅक्सिनची निर्यात करण्यात जगात २/३ इतका वाटा केवळ भारताचा आहे. आयसीएमआर (ICMR) आणि भारत बायोटेकने एक एमओयू करार केला असून त्यानुसार भारत सरकारला स्वस्त दरांमध्ये वॅक्सीन उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. त्याचबरोबर सीरम इन्स्टिट्यूटसोबतही अशाच प्रकारचा करार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

सर्वात आधी 'यांना' मिळणार लस
हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले की, कोरोनाची वॅक्सीन उपलब्ध झाल्यावर सर्वात आधी आरोग्य सेवेतील (हेल्थकेअर) तसेच कामगारांना (फ्रंटलाइन  वर्कर्स) ही लस टोचण्यात येणार आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजार असलेल्या रुग्णांना प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर उपलब्ध लसींच्या संख्येनुसार सर्वांना ही लस देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. 

- देशभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com