योगींना 24 तासात संपवेन, हिंमत असेल तर शोधून दाखवा; अज्ञाताची उघड धमकी

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 11 January 2021

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे.

लखनऊ- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे. यावेळी 112 कंट्रोल रुमच्या व्हॉट्सऍप नंबरवर धमकीचा मेसेज पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी रविवारी सुशांत गोल्फ सिटी पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सर्वेलन्सच्या मदतीने मेसेज पाठवणाऱ्याचा शोध लावला जात आहे. 

शिकागोत सिरियल किलिंगचा थरार; सनकी व्यक्तीकडून तिघांचा खात्मा तर चौघे जखमी

पोलिस कंट्रोल रुमच्या 112 व्हॉट्सऍप नंबरवर शनिवारी रात्री 8 वाजून 7 मिनिटाला एका मोबाईल नंबरवरुन मेसेज आला. यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धकमी देण्यात आली होती. यामध्ये म्हणण्यात आलं होतं की, ''योगी आदित्यनाथ यांची 24 तासात हत्या केली जाईल, हिंमत असेल तर शोधून दाखवा. एके 47 ने 24 तासांच्या आत त्यांना मारुन टाकेन''.

धमकीचा मेसेज आल्यानंतर अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत 112 मध्ये तैनात ऑपरेशन कमांडर सहेंद्र यादव यांनी सुशांत गोल्फ सिटी पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. तसेच सर्वेलन्सच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला जात आहे. 

संसद पाडा अन्..., मुनव्वर राणांच्या टि्वटमुळे नवा वाद

पोलिसांची सर्वेलन्स टीम आणि काईम ब्रँच मेसेज पाठवण्याचा शोध घेत आहे. डीसीपी साऊथ रवी कुमार यांच्यानुसार आतापर्यंतच्या तपासात कळतंय की धमकी देणारा व्यक्ती दुसऱ्या शहरातील आहे. मेसेज पाठवण्यात आलेल्या मोबाईल नंबरविषयी पूर्ण माहिती मिळाली आहे. पोलिसांनी अधिक माहिती देणे टाळले. पण, धमकी देणाऱ्याला लवकरच पकडले जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना यापूर्वीही अनेकदा धमक्या आल्या आहेत. अनेकांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. योगी आदित्यनाथ दहशतवाद्यांचे हिट लिस्टवर आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी लागते. योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षेमध्ये उत्तरोत्तर वाढ करण्यात आली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unknown person threaten cm yogi aadityanath on whatsapp message