हायकोर्टाच्या ऑनलाईन सुनावणीत वाजलं जुहीचं 'घुंघट की आड से...'

कोर्टाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या आयटी विभागाला त्या व्यक्तीची ओळख पटवून आवश्यक कार्यवाहीसाठी दिल्ली पोलिसांना कळविण्यास सांगितले आहे.
juhi chawla
juhi chawlafile photo
Summary

कोर्टाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या आयटी विभागाला त्या व्यक्तीची ओळख पटवून आवश्यक कार्यवाहीसाठी दिल्ली पोलिसांना कळविण्यास सांगितले आहे.

नवी दिल्ली : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावलाने देशभरात 5-जी वायरलेस नेटवर्क स्थापित करण्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी बुधवारी (ता.२) ऑनलाइन सुनावणीही झाली. या सुनावणीमध्ये तीनवेळा व्यत्यय आला. पर्यावरणवादी अभिनेत्री जुही चावला देखील या सुनावणीस उपस्थित होती. जेव्हा जुही ऑनलाइन सुनावणीमध्ये सामील झाली, तेव्हा एका चाहत्याने १९९३ साली प्रदर्शित झालेल्या 'हम हैं राही प्यार के' या चित्रपटातील 'घुंघट की आड से दिलबर का...' हे गाणे गुणगुणण्यास सुरवात केली. (Unknown persons sing songs into HC virtual hearing on Juhi Chawla’s suit against 5G)

न्यायमूर्ती जे. आर. मिधा यांनी सुनावणीदरम्यान हे गाणे म्यूट करण्यास सांगितले. जुही चावला यांची बाजू मांडताना वकील दीपक खोसला म्हणाले की, 'प्रतिवादींपैकी कोणीही काढून टाकणार नाही, अशी आशा आहे.' फिर्यादीकडून कोर्टात फी जमा करण्याबाबत सुनावणी सुरू होताच आणि एका व्यक्तीने आणखी एक बॉलिवूड गाणे गाण्यास सुरवात केली.

juhi chawla
दुसऱ्या लाटेपक्षाही कोरोनाची तिसरी लाट अधिक भयावह असेल : SBI

सुनावणीदरम्यान, दुसर्‍या सहभागी व्यक्तीने पुन्हा जुहीच्या चित्रपटातील गाणे गायले. यावेळी 'लाल लाल ओठ पे गोरी किसका नाम है...' गाण्याचा आवाज कोर्टरूममध्ये ऐकू येऊ लागला. त्यावेळी सुनावणीतून सदर व्यक्तीला हटविण्यात आले. पण हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. पुन्हा कुणीतरी 'मेरी बन्नो की आएगी बरात...' गाणे गाण्यास सुरवात केली. त्यानंतर न्यायाधीशांनी त्या व्यक्तीची ओळख पटवून न्यायालयाच्या अवमानाची नोटीस बजावण्याचे आदेश दिले. कोर्टाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या आयटी विभागाला त्या व्यक्तीची ओळख पटवून आवश्यक कार्यवाहीसाठी दिल्ली पोलिसांना कळविण्यास सांगितले आहे.

juhi chawla
महाराष्ट्राची 'लेडी सिंघम' मेहुल चोक्सीला आणणार भारतात!

दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी (ता.2) अभिनेत्री जुही चावलाला देशात 5-जी वायरलेस नेटवर्क स्थापित करण्याच्या विरोधात केलेल्या याचिकेवर एक संक्षिप्त नोट दाखल करण्यास सांगितले. देशात 5-जी वायरलेस नेटवर्क स्थापित करण्याच्या विरोधात जुहीने सोमवारी (ता.३१) उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी या तंत्रज्ञानाच्या किरणोत्सर्गाचा नागरिक, प्राणी, वनस्पती आणि अन्य जीवांवर होणाऱ्या दुष्परिणामांबाबतचा मुद्दा उपस्थित केला.

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com